घरठाणेपालिकेच्या तिजोरीत ११९ कोटी ६७ लाख जमा

पालिकेच्या तिजोरीत ११९ कोटी ६७ लाख जमा

Subscribe

ठाणे महापालिकेने मालमत्ता कर भरण्यासाठी चार महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या मोबाईल व्हॅनचा एक हजार ३४४ जणांनी लाभ घेतला आहे.

ठाणे महापालिकेने मालमत्ता कर भरण्यासाठी चार महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या मोबाईल व्हॅनचा एक हजार ३४४ जणांनी लाभ घेतला आहे. या व्हॅनच्या माध्यमातून महापालिकेच्या तिजोरीत मालमत्ता करापोटी ११९ कोटी ६७ लाख रुपयांचा भरणा झाला आहे. मालमत्ता कर रोखीने, धनादेश, डेबिट कार्ड, एटीएम कार्डने देखील भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कर भरल्यानंतर पावती देण्याची व्यवस्था मोबाईल व्हॅनमध्ये करण्यात आली आहे. तसेच एखाद्या गृहसंकुलाने मागणी केल्यास मोबाईल व्हॅन तेथे पाठवण्यात येणार असल्याचे महापालिका सूत्रांनी सांगितले आहे.

ठाणेकर नागरिकांना त्यांच्या दारातच मालमत्ता कर भरता यावा यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या संकल्पनेतून सुरु १५ ऑक्टोबर रोजी मोबाईल व्हॅन हा उपक्रम महापालिकेच्या दहा प्रभाग समितींमध्ये फिरत सुरू असून नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मालमत्ता करदात्याच्या दारी जाऊन कर वसूल करण्याच्या दृष्टिकोनातून बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या सहकार्याने स्मार्ट कर संग्रह प्रणाली ही मोबाईल व्हॅन तयार करण्यात आली आहे. ही व्हॅन पूर्णत: रिझर्व बँक ऑफ इंडिया यांचे प्रमाणकानुसार असून यामध्ये संगणक, प्रिंटर आणि त्याकरता लागणाऱ्या सर्व सुविधा तसेच ऑपरेटर, ड्रायव्हर आणि सुरक्षा रक्षकही पुरवण्यात आले आहेत. याबाबतचा सर्व खर्च बँक ऑफ महाराष्ट्र यांच्यामार्फत करण्यात आला आहे.

- Advertisement -

या व्हॅनद्वारे एखाद्या गृहनिर्माण संस्थेमध्ये मालमत्ता कर वसूल करावयाचा असल्यास सदर व्हॅन त्या प्रभाग कार्यालयाकडे पाठवण्यात येते. या व्हॅनद्वारे मालमत्ता करदात्यांनी मालमत्ता कर देयकाची मागणी केल्यास देयक सुद्धा देण्यात येत आहे. या मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून आतापर्यंत १३४४ नागरिकांनी आपला मालमत्ता कराचा भरणा केला आहे. बऱ्याच नागरिकांना ऑनलाईन मालमत्ता कर भरता येत नसून दुसरीकडे कोरोना काळात कार्यालयात जाऊन कर भरणो शक्य नसल्याने हा उपक्रम चांगलाच उपयोगी पडला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -