घरदेश-विदेशकोरोनाच्या नव्या स्ट्रेनवरही लवकरचं लस येणार

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवरही लवकरचं लस येणार

Subscribe

भारतात गेल्या काही दिवसांपासून कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. यातच आता कोरोनावर लस निर्माण करणार भारत बायोटिक आणि बायोलॉजिकल ई लिमिटेडने सोमवारी कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवरही लस येणार असल्याचे जाहीर केले आहे. यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, COVID-19 च्या नव्या स्ट्रेनशी लढण्यासाठी वॅक्सीन कंपन्या लवकरचं लसीकरणावर काम करत आहे. गेल्या काही महिन्यांपासून ब्राझील, ब्रिटेन, दक्षिण आफ्रिकासारख्या देशांतील रुग्णांमध्ये कोरोनाचे नवा स्ट्रेन आढळून आला आहे. भारतात आत्तापर्यंत जवळपास १.१० कोटी कोरोना संक्रमित रुग्ण आढळले. तर १.५६ लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जगातील इतर देशांची कोरोना आकडेवारी पाहता अमेरिकेपाठोपाठ भारताचा क्रमांक लागत आहे. . इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) चे उप-महानिदेशक निवेदिता गुप्ता यांनी सांगितले की, रुग्णांच्या स्वॅबवर काम करत आहोत. कारोना हॉटस्पॉट ठरलेल्या ठिकाणाहून नमुने गोळा करत आहोत. त्यानुसार आता स्वॅबच्या नमुन्यांवर काम करुन नव्या स्ट्रेनवरही लस निर्माण करु.

ICMR आण भारत बायोटेक कंपनीने भारतात सर्वप्रथम कोरोनावर लस तयार केली. या लसीला मान्यता मिळाल्यानंतर भारतात या लसीकरण मोहिमेचा पंतप्रधान मोदींच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यानंतर संपूर्ण देशभरात आता लसीकरणाला सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांत देशात ११ लाखाच्या घरात लसीकरण झाले आहे. त्यामुळे जगातील सर्वात मोठी कोरोना लसीकरण मोहिम भारतात सुरु झाली आहे. त्याचप्रमाणे कोरोना लसीकरणाचे मोठ्या प्रमाणात डोस निर्माण करण्याचा दावा या कंपन्यांनी केला आहे. यासंदर्भात भारत बायोटेक कंपनीचे अध्यक्ष कृष्णा एला यांनी सांगितले की, कंपनीला सध्या या नव्या स्ट्रेनवर लस निर्मितीसाठी आईसीएमआर आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या मदतीची आवश्यकता भासणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा- वनमंत्री संजय राठोड पोहरादेवीला रवाना, समर्थकांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -