घरमहाराष्ट्रनाशिककोविडच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत साईंच्या दर्शनासाठी नवी नियमावली; 'या' वेळात घेता येणार दर्शन

कोविडच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत साईंच्या दर्शनासाठी नवी नियमावली; ‘या’ वेळात घेता येणार दर्शन

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनासाठी नवीन नियमावली जाहीर

२०२० मध्ये कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता राज्यातील मंदिरे, धार्मिक कार्यक्रम १० महिने पूर्णपणे बंद करण्यात आले होते. मात्र कोरोनाची परिस्थिती हळूहळू नियंत्रणात आल्यानंतर पुन्हा एकदा कोरोनाचे नियम पाळत राज्यातील धार्मिक स्थळं भाविकांसाठी खुली करण्यात आली होती. मात्र पुन्हा राज्यात कोरोनाचा उद्रेक वाढताना दिसतोय. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनासाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनाकरता भाविकांना सकाळी ६ ते रात्री ९ पर्यंतची वेळ देण्यात आली आहे. यासह मंदिरात होणारी पहाचेटी काकड आरती आणि रात्रीच्या शेजारतीला भाविकांना हजर राहण्यास परवानगी नाही. लागोपाठ येणाऱ्या सुट्ट्या आणि गुरूवारच्या दिवशी भाविकांना Online Pass अनिवार्य असणार आहे. तर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गुरूवारी होणारा साई बाबांचा पालखी सोहळा देखील रद्द करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

साईंच्या दर्शनासाठी अशी आहे नवी नियमावली

  • दर्शनाची वेळ सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत असणार आहे.
  • सकाळची काकड आरती आणि रात्रीची शेजारती भक्तगणांसाठी खुली नसणार
  • मुख दर्शन सुविधा फक्त या कालावधीत कोविड मार्गदर्शक तत्वे अनुसुरून चालू ठेवण्यात येणार आहे.
  • गुरुवारची पालखी व्यवस्था देखील या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आली आहे.
  • बायोमेट्रिक पास काऊंटरवर होत असलेल्या गर्दी पाहता गुरूवार, शनिवार, रविवार तसेच उत्सवाचे दिवस बायोमेट्रिक पास काऊंटर बंद करण्यात आले आहे. ऑनलाईन दर्शन पास व्यवस्था चालू असणार आहे.
  • भक्तांची दर्शन रांगेत ढोबळ चीचणी करण्यात येणार आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी १५० तर गुरूवार, शनिवार आणि रविवारी २०० जणांची चाचणी घेण्यात येणार आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -