घरट्रेंडिंगऑर्डर कॅन्सल केल्याने डिलिवरी बॉयची सटकली, तरुणीच्या नाकावर मारला बुक्का

ऑर्डर कॅन्सल केल्याने डिलिवरी बॉयची सटकली, तरुणीच्या नाकावर मारला बुक्का

Subscribe

झोमॅटो बॉयने मारलेला बुक्त इतका जोरात होता की तरुणीला तिच्या नाकाची सर्जरी करावी लागली.

सध्या जेवणासाठी झोमॅटो फूड डिलिव्हरी कंपनीला सर्वात जास्त प्रधान्य देण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून झोमॅटोवरुन फूड ऑर्डर करण्याचे प्रमाणही वाढले आहे. कमी वेळात घरपोच डिलिव्हरी मिळत असल्याने लोकांनी या पर्यायाला जास्त पसंती दिली आहे. मात्र कधी कधी झोमॅटो वरुन डिलिव्हरी करणाऱ्या बॉयचा त्रासही सहन करावा लागतो. झोमॅटोवरुन फूड ऑर्डर करणे एक तरुणीला चांगलेच महागात पडले आहे. हितेशा चंद्राणी नावाच्या एका तरुणीने झोमॅटोवरुन जेवण ऑर्डर केले मात्र त्यानंतर तिने ऑर्डर कॅन्सल केली. या गोष्टीचा राग आल्याने झोमॅटो बॉयने तरुणीच्या थेट नाकावरच बुक्का मारला. झोमॅटो बॉयने मारलेला बुक्त इतका जोरात होता की तरुणीला तिच्या नाकाची सर्जरी करावी लागली. सध्या हा घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हितेशा चंद्राणी या तरुणीनेच हा तिचा व्हिडिओ तिच्या सोशल मीडियावरून शेअर केला आहे.

- Advertisement -

हितेशा चंद्राणी ही तरुणी बंगळूर येथे राहते. ती एक ब्यूटी इन्फ्लूएन्सर आहे. तिने दुपारच्या सुमारास भुक लागल्याने झोमॅटोवरुन जेवण ऑर्डर केले. मात्र तिने केलेली ऑर्डर पोहचायला खूप उशिर झाला. त्यामुळे तिने ती ऑर्डर कॅन्सल केली. त्यानंतर डिलिव्हरी बॉय डिलिव्हरी घेऊन आला त्याला तिने ऑर्डर कॅन्सल केल्याचे सांगितले मात्र डिलिव्हरी बॉय चिडला आणि त्याने तिच्या नाकावर जोरात बुक्का मारला. मुक्का मारल्याने हितेशाच्या नाकाची हड्डी तुटली. त्यामुळे तिच्या नाकाची सर्जरी करावी लागली. हितेशाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये हितेशाच्या नाकातून प्रचंड रक्त येताना दिसत आहे. त्यानंतर तिच्या नाकाची सर्जरी केल्यानंतरही हितेशाने व्हिडिओ केला आहे. या व्हिडिओत हितेशाने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला आहे.

हितेशाने या व्हिडिओत असे सांगितले आहे की, जेव्हा हा प्रकार घडला तेव्हा तिच्या इमारतीतील कोणीही तिथे नव्हते. डिलिव्हरी बॉयने मारलेल्या बुक्क्यामुळे तिच्या नाकाची हड्डी तुटली आणि त्यामुळे तिच्या नाकाची सर्जरी करावी लागल्याची तक्रार तिने पोलिसात केली आहे. हितेशाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. हा व्हिडिओ पाहून झोमॅटो कंपनीनेही तिला रिप्लाय दिला. त्यात असे म्हटले गेली आहे, आपल्याला योग्य मेडिकल हेल्प करण्यासाठी आणि पोलिसांना या तपासात मदत करण्यासाठी आमचे स्थानिक प्रतिनिधी तुमच्याशी लवकरच संपर्क करतील. त्याचबरोबर त्यांनी हितेशासोबत घडलेल्या घटनेबद्दल दिलगीरी व्यक्त केली. भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडल्यास आम्ही त्यांच्यावर योग्य कारवाई करु, असेही त्यांनी म्हटले.

- Advertisement -

हेही वाचा – भलतंच काहीतरी! सेक्स न करताच महिला झाली प्रेग्नंट!

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -