घरदेश-विदेशममता बॅनर्जींना झालेल्या दुखापतीबाबत निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

ममता बॅनर्जींना झालेल्या दुखापतीबाबत निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Subscribe

निवडणूक आयोगाने रविवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना दुखापत झाल्याच्या प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. निवडणूक आयोगाने आपल्या पर्यवेक्षकांच्या सूचनेनुसार पूर्व मिदनापूरचे एसपी प्रवीण प्रकाश आणि डीएम विभू गोयल यांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्यात आले आहे. ममता बॅनर्जी यांच्या सुरक्षेचा प्रभारी पोलिस अधिकारी विवेक सहाय यांनाही निलंबित करण्यात आले आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने पोलिसांना दिले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा अहवाल ३१ मार्चपर्यंत मागितला असल्याचे वृत्त आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना निवडणूक प्रचार मोहिमेदरम्यान दुखापत झाल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चांना उधाण आलं आहे. या प्रकरणात टीएमसी नेत्यांनी निवडणूक आयोगाला भेट देऊन निष्पक्ष चौकशीची मागणी केली. त्याचबरोबर रविवारी या प्रकरणावर आयोगाने विशेष बैठक बोलविली. त्यानंतर आयोगाने नंदीग्राम प्रकरणावर कारवाई करत मुख्यमंत्री ममता बॅनर्जीच्या सुरक्षा संचालकांना पदावरून हटवण्यात आले आहे.

- Advertisement -

यासह पूर्व मिदनापूरच्या डीएम आणि एसपीवर कारवाई करण्यात आली आहे. डीएम विभू गोयल यांची तातडीने प्रभागात बदली झाली आणि त्यांना गैर-निवडणूक पदावर नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. गोयल यांच्या जागी २००५ सालची बॅचची आयएएस अधिकारी स्मिता पांडे यांची नेमणूक करण्यात येईल, असे सांगितले जात आहे. तर मुख्यमंत्र्यांच्या प्रचाराच्या दौऱ्यादरम्यान सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात अपयशी ठरलेल्या पूर्व मिदनापूरचे पोलिस अधीक्षक एसपी प्रवीण प्रकाश यांनाही तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक एसपी प्रवीण प्रकाश यांच्या जागी २००९ साली बॅचचे आयपीएस सुनील यादव हे पदभार स्वीकारणार असल्याची माहिती आहे.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -