घरताज्या घडामोडीराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहकार्यवाहकपदी दत्तात्रय होसबळे, अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत घोषणा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहकार्यवाहकपदी दत्तात्रय होसबळे, अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत घोषणा

Subscribe

बंगळुरू येथे अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) च्या सहकार्यवाहकपदी दत्तात्रय होसबळे यांची निवड करण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातले हे दुसऱ्या क्रमांकाचे असे महत्वाचे पद आहे. मुळचे कर्नाटकातील असणारे दत्तात्रय होसबळे यांनी दत्तात्रय होसबळे यांनी संघाचे प्रचारक बनून पूर्णकालीन संघाचेच काम केले आहे. सुरूवातीच्या काळात जवळपास १५ वर्षे त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय संघटन मंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. दत्तात्रय होसबळे यांनी २००९ पासून सहकार्यवाहक म्हणून काम पाहिले होते. आज शनिवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहकार्यवाहकपदी त्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत घेण्यात आला. पहिल्यांदाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक ही नागपूर बाहेर बंगळुरू येथे होत आहे. (Dattatray Hosbale appointed as general secreatary of Rashtriya swayamsevak sangh)

संघाचे माजी सहकार्यवाहक सुरेश भय्याजी जोशी यांच्या जागेवर दत्तात्रय बोसबळे काम करतील. याआधीच सुरेश भय्याजी जोशी यांनी २०१८ मध्ये आपल्याला या जबाबदारीतून मुक्त करावे अशी मागणी केली होती. पण त्यांच्या नेतृत्वात संघाचा वाढता कामांचा विस्तार पाहता त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. सहकार्यवाहक पदावरील नवीन नियुक्ती मिळालेले दत्तात्रय होसबळे यांची नियुक्ती ही तीन वर्षांसाठी असेल. दत्तात्रय होसबळे हे इंग्लिश लिटरेचरचे पदवीधारक आहेत. त्यांचे संस्कृतसह अनेक भाषांमध्ये प्रभुत्व आहे. कन्नड ही त्यांची मातृभाषा आहे. कन्नड भाषेतील असिमा नावाच्या मासिकाचेही ते संस्थापक संपादक आहेत. तसेच होसबळे हे दिल्लीस्थित इंडियन पॉलिसी फाऊंडेशनचे संस्थापक विश्वस्त आहेत. संघाची विचारधारेचा देशासह विदेशातही प्रचार करण्याचे श्रेय त्यांना जाते. नेपाळमध्ये झालेल्या भूकंपाच्या नैसर्गिक संकटातही त्यांनी आपले योगदान दिले होते. देशात विद्यार्थी परिषदेत पूर्वोत्तर भागापासून ते अंदमान निकोबारपर्यंत मोठ्या विस्ताराचे श्रेय हे दत्तात्रय होसबळेंना दिले जाते. संघातले तरूण नेतृत्व अशी त्यांची ओळख आहे. तसेच गुवाहाटीच्या युवा विकास केंद्र स्थापनेतही त्यांचा मोठा वाटा आहे. संघाकडून त्यांना २००४ मध्ये बौद्धिक प्रमुखदेखील बनवण्यात आले होते. विद्यार्थी काळात लादलेल्या आणीबाणीत त्यांनी मिसा कायद्याअंतर्गत कारागृहात काही दिवस घालवले होते.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -