घरमनोरंजनप्रसाद ओक दिग्दर्शित 'चंद्रमुखी' चित्रपटाचा टीजर रिलिज

प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ चित्रपटाचा टीजर रिलिज

Subscribe

कच्चा लिंबू,हिरकणी सारख्या अनेक दर्जेदार चित्रपटच्या दिग्दर्शना नंतर आता प्रसाद ओक 'चंद्र्मुखी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आला आहे

मराठमोळा अभिनेता,दिग्दर्शक प्रसाद ओक हा त्याच्या अभिनयातून प्रेक्षकांचे सतत मनोरंजन करतच असतो. तसेच त्याने दिग्दर्शित केलेले चित्रपट देखील प्रेक्षक डोक्यावर उचलून घेतात. कच्चा लिंबू,हिरकणी सारख्या अनेक दर्जेदार चित्रपटांच्या  दिग्दर्शना नंतर आता प्रसाद ओक ‘चंद्र्मुखी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आला आहे. नुकताच सोशल मीडियावर या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित करण्यात आला आहे. प्रसिद्ध लेखक विश्वासराव पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरी वर आधारित हा चित्रपट आहे. चित्रपटाचे टीजर नुकतच प्रदर्शित करणायात आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prasad Oak (@oakprasad)

- Advertisement -

‘चंद्रमुखी’ चित्रपटाच्या टीजरमध्ये घुंगरू आणि ढोलकीच्या तालावर चालत येणाऱ्या स्त्रीची पाउलं दाखवण्यात आली आहेत. ती हळुवार पाउलांनी चालत येत एका पाटावर उभी राहते. पण ‘चंद्रमुखी’ चित्रपटात कोणत्या कलाकारांची वर्णी लागली आहे हे अद्याप गुलदस्त्यात आहे. तसेच काही दिवसांपूर्वी टीजर तसेच पोस्टर मध्ये दाखवण्यात आलेल्या स्त्री ची भूमिका स्वत: प्रसाद ओक साकरणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. प्रेक्षकांनी टीजरला चांगलीच पसंती दर्शवली आहे. या बहुचर्चित चित्रपटाच संगीत अजय अतुल ही दमदार जोडी करणार आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असल्याचे दिसतेय येत्या दिवाळीत ५ नोव्हेंबर २०२१ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ठरवण्यात आली आहे. याआधी प्रसाद ने दिग्दर्शित केलेले चित्रपट हे अत्यंत लोकप्रिय झाले आहेत. ‘कच्चा लिंबू’ सारख्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आता प्रगतीचे शिखर गाठल्या नंतर आता प्रसाद ओक चा आगामी चित्रपट ‘चंद्रमुखी’ प्रेक्षकांवर आपली जादू कायम ठेऊ शकेल का हे पाहावं लागेल.


हे हि वाचा – दिग्दर्शक राम गोपाल वर्मा कुंभमेळ्यातील गर्दी पाहून संतापले, म्हणाले दुप्पट कर्म भोगावे लागतील

- Advertisement -

 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -