घरताज्या घडामोडीViral Video: लॉकडाऊन नाही आहे का? रणबीरचा पापाराझींना सवाल

Viral Video: लॉकडाऊन नाही आहे का? रणबीरचा पापाराझींना सवाल

Subscribe

रणबीर कपूरचा क्लिनिक बाहेरील व्हिडिओ झाला सोशल मीडियावर व्हायरल

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर (Ranbir Kapoor) कोरोनाबाधित झाल्यानंतर खूपच चर्चेत आला आहे. पण त्याने काही दिवसांपूर्वी कोरोनावर मात केली आहे. आज (गुरुवार) रणबीर कपूरला क्लिनिक बाहेर स्पॉट केले गेले. त्यावेळेस त्याच्यासोबत आई नीतू कपूर (Neetu Kapoor) देखील होत्या. रणबीरने क्लिनिकमध्ये एंट्री करण्यापूर्वी पापाराझींना सवाल केला की, कोरोना वाढत असताना तुमच्या लोकांसाठी लॉकडाऊन नाही आहे का?

सध्या रणबीरचा क्लिनिकबाहेर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, रणबीर आणि त्याची आई नीतू कपूर वेगवेगळ्या गाडीने क्लिनिकमध्ये पोहोचले. त्यावेळेस रणबीर आपल्या गाडीच्या बाहेर येताच त्याने फोटोग्राफर्सना विचारले की, तुमचा लोकांचा लॉकडाऊन नाही आहे का? या प्रश्नावर फोटोग्राफर्सने उत्तर दिले की, सर परंतु आमचे काम सुरू आहे. एवढेच नाहीतर क्लिनिकमध्ये जाताना रणबीरने सर्वांना सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यास सांगितले. यावेळेस रणबीरची आई नीतू कपूर क्लिनिक बाहेर स्पॉट केले गेले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

- Advertisement -

क्लिनिमध्ये जाताना रणबीरने स्वेटशर्टसोबत आर्मीची ग्रीन कलरची कार्गो पॅन्ट आणि स्नीकर्स घातले आहे. तसेच त्याने या आउटफिटबरोबर ब्लू कॅप आणि ग्रे मास्क घातला आहे. तर रणबीरच्या आई नीतू कपूर यांनी ब्लू टॉप आणि ब्लू जीन्स घातली आहे. तसेच कोरोनाचे भान ठेवून नीतू यांनी मास्कच्यावरती फेस शील्ड घातला आहे.

Neetu Kapoor
नीतू कपूर

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाले तर रणबीर लवकरच अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात रणबीरसोबत आलिया असून पहिल्यांदाच दोघे जण एकत्र स्क्रीन शेअर करणार आहे. याशिवाय रणबीरकडे ‘शमशेरा’, ‘अॅनिमल’ आणि ‘लव्ह रंजन’ चित्रपट आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – ‘एक व्हिलन २’च्या चित्रीकरणाला सुरुवात, मोहितसोबत पुन्हा काम करण्यास अर्जून कपूरची उत्सुकता


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -