घरमहाराष्ट्रजिगरबाज मयुर शेळके यांना रेल्वे मंत्रालयाकडून ५० हजारांचे बक्षीस जाहीर

जिगरबाज मयुर शेळके यांना रेल्वे मंत्रालयाकडून ५० हजारांचे बक्षीस जाहीर

Subscribe

केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनीही ट्विटरवर मयुर शेळके यांचे कौतुक केले आहे.

वांगणी रेल्वे स्थानकात जीवाची बाजी लावत मयुर शेळके या तरुणाने रेल्वे पट्रीवर पडलेल्या चिमुकल्याचा धावत्या रेल्वे समोर जात जीव वाचवला आहे. या सुपर हिरो ठरलेल्या रेल्वेच्या पॉईंटमन मयुर शेळकेचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. मयुर शेळकने स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रुळावर पडलेल्या चिमुकल्याचे प्राणा वाचवले. त्याचा या जिगरबाज कामगिरीची केंद्रीय रेल्वे मंत्रालयानेही दखल घेत त्य़ाला ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

रेल्वे मंत्रालयाने या संबंधित घटनेचा व्हिडीओ आपल्या ट्विटर हॅण्डलवर शेअर करत लिहिले आहे की, “परोपकारी: मध्य रेल्वेच्या वांगणी रेल्वे स्थानकावर पॉईंटमन मयुर शेळके यांनी चिमुकल्य़ाचे प्राण वाचवले. मुलाला वाचवण्यासाठी त्यांनी आपला जीव धोक्यात घातला. रेल्वेकडून त्यांच्या धाडसाला आणि कर्तव्यदक्षतेला सलाम करतो. ”

- Advertisement -

तर केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनीही ट्विटरवर मयुर शेळके यांचे कौतुक केले आहे. “मयुर यांच्या कामगिरीचे मोल पैशात मोजता येणार नाही. पण कर्तव्यावर असताना मानवतेला प्रेरणा देणारे कार्य केल्याबद्दल त्यांचा सन्मान केला जाईल.” असे गोयल यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

मयुर शेळके यांनी क्षणाचाही विलंब केला असता तर कदाचित अंध आईने आपल्या मुलाला गमावले असते. परंतु मयुर यांनी आपल्या जीव धोक्यात घालत चिमुकल्याचे प्राण वाचवले आणि मोठी दुर्घटना रोखली.

वांगणी रेल्वे स्थानकात शनिवारी सायंकाळी ५ वाजल्याच्या सुमारास ही घडली. एक अंध आई आपल्या मुलाचा हात पकडून रेल्वे स्थानकात चालत होती. अचानक त्या आईच्या हातातून सुटून तो लहान मुलगा रेल्वे ट्रॅकवर पडतो. याचदरम्यान समोरुन भरधाव वेगाने या रेल्वे स्थानकाच्या दिशेने उद्यान एक्सप्रेस येत होती. पण काहीही दिसत नसल्याने तिला मुलाला पटरीवरून वर काढू कसे कळत नव्हते. तेवढ्यात भरधाव येणाऱ्या उद्यान एक्स्प्रेसचा हॉर्न वाजला. यावेळी घाबरलेली ती अंध आई आपल्या मुलाला बाहेर काढण्यासाठी अतोनात प्रयत्न करत होती. मात्र फलाटाचा अंदाज येत नसल्याने ती चाचपडत होती.

मुलाला वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने ओरडत होती. यावेळी ड्युटीवर असलेला पॉइंटमन मयूर शेळके हा ट्रॅकमधून तिथे धावत आला आणि त्याने क्षणार्धात त्या मुलाला फलाटावर उचलून स्वतःही फलाटावर गेला. भरधाव येणाऱ्या मेलसमोर धावत स्वत:च्या जीवाची पर्वा न करता त्या मुलाचा जीव मयुर शेळके याने वाचवला. क्षणाचाही विलंब झाला असता तर एक्स्प्रेसच्या धक्क्याने शेळके आणि त्या मुलाचा जीव जागीच गेला असता. मात्र आपल्या जीवाची पर्वा न करता त्या मुलाला जीवदान देणाऱ्या शेळकेच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक सुरू आहे. मुयर शेळकेच्या या धाडसी कृत्याचा प्रकार तिथल्या सीसीटीव्ह कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तसेच अनेक राजकीय नेते आणि सोशल मीडिया युजर्सही मयुरच्या धाडसाचे कौतुक करत आहेत.


ट्रॅकवर पडलेल्या मुलाला अंध आई चाचपडत राहिली, रेल्वे पॉईंटमनने जीवाची बाजी लावून वाचवले प्राण
sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -