घरमुंबईट्रॅकवर पडलेल्या मुलाला अंध आई चाचपडत राहिली, रेल्वे पॉईंटमनने जीवाची बाजी लावून...

ट्रॅकवर पडलेल्या मुलाला अंध आई चाचपडत राहिली, रेल्वे पॉईंटमनने जीवाची बाजी लावून वाचवले प्राण

Subscribe

कोरोना संकटात रक्ताची नाती परक्याप्रमाणे वागत असल्याच्या घटना घडत असतानाच काही लोकांमध्ये आजही कुठेतरी थोडी माणुसकी शिल्लक असल्याची घटना बदलापूर वांगणी रेल्वेस्थानकात पाहयला मिळाली. एक लहान चिमुरडा आईचा हात धरून वांगणी रेल्वे स्थानकावर चालत होता मात्र चालता चालता तोल जाऊन तो रेल्वे ट्रॅकवर कोसळला यावेळी समोरुन भरधाव वेगाने एक्सप्रेस येत होती. यावेळी या चिमुकल्याची अंध आई आपल्या मुलाला वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने ओरडत होती. तेव्हा रेल्वेच्या एका पॉईंटमनने क्षणाचाही विलंब न करता देवादूतासारखा धावत येत जीवाची पर्वा न करता चिमुकल्याचे प्राण वाचवले.

वांगणी रेल्वे स्थानकात शनिवारी सायंकाळी ५ वाजल्याच्या सुमारास ही घडली. एक अंध आई आपल्या मुलाचा हात पकडून रेल्वे स्थानकात चालत होती. अचानक त्या आईच्या हातातून सुटून तो लहान मुलगा रेल्वे ट्रॅकवर पडतो. याचदरम्यान समोरुन भरधाव वेगाने या रेल्वे स्थानकाच्या दिशेने उद्यान एक्सप्रेस येत होती. पण काहीही दिसत नसल्याने तिला मुलाला पटरीवरून वर काढू कसे कळत नव्हते. तेवढ्यात भरधाव येणाऱ्या उद्यान एक्स्प्रेसचा हॉर्न वाजला. यावेळी घाबरलेली ती अंध आई आपल्या मुलाला बाहेर काढण्यासाठी अतोनात प्रयत्न करत होती. मात्र फलाटाचा अंदाज येत नसल्याने ती चाचपडत होती.

- Advertisement -

मुलाला वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने ओरडत होती. यावेळी ड्युटीवर असलेला पॉइंटमन मयूर शेळके हा ट्रॅकमधून तिथे धावत आला आणि त्याने क्षणार्धात त्या मुलाला फलाटावर उचलून स्वतःही फलाटावर गेला. भरधाव येणाऱ्या मेलसमोर धावत स्वत:च्या जीवाची पर्वा न करता त्या मुलाचा जीव मयुर शेळके याने वाचवला. क्षणाचाही विलंब झाला असता तर एक्स्प्रेसच्या धक्क्याने शेळके आणि त्या मुलाचा जीव जागीच गेला असता. मात्र आपल्या जीवाची पर्वा न करता त्या मुलाला जीवदान देणाऱ्या शेळकेच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक सुरू आहे. मुयर शेळकेच्या या धाडसी कृत्याचा प्रकार तिथल्या सीसीटीव्ह कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तसेच अनेक राजकीय नेते आणि सोशल मीडिया युजर्सही मयुरच्या धाडसाचे कौतुक करत आहेत.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -