घरताज्या घडामोडीMaharashtra Lockdown 2021: मुंबई उपनगरीय लोकलमध्ये कोणाला प्रवेश मिळणार ?

Maharashtra Lockdown 2021: मुंबई उपनगरीय लोकलमध्ये कोणाला प्रवेश मिळणार ?

Subscribe

पुढील १० दिवसात राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मुंबईची लाईफ लाईन असेलली मुंबई लोकलही लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्यांसाठी बंद असणार आहे.

राज्यात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने आजपासून राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. आज रात्री ८ वाजल्यापासून ते १ मे पर्यंत कडक लॉकडाऊन असणार आहे. पुढील १० दिवसात राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मुंबईची लाईफ लाईन असेलली मुंबई लोकलही लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्यांसाठी बंद असणार आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी लोकलने प्रवास करु शकणार आहे. लोकांना आयकार्ड तपासूनच लोकलचे तिकीट देण्यात येणार आहे. राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयाला लॉकडाऊनदरम्यान लोकल प्रवासासाठी नवी नियमावली सादर केली आहे. मुंबई उपनगरीय लोकलमध्ये कोणाला प्रवेश दिला जाणार आहे याबाबत नवीन यादी देण्यात आली आहे.

- Advertisement -

मुंबई उपनगरीय लोकलमध्ये कोणाला प्रवेश?

  • पुढील १० दिवसांसाठी लागू केलेल्या लॉकडाऊनच्या काळात सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांना मुंबई उपनगरीय लोकलने प्रवास करता येणार आहे.
  • मंत्रालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचारी  लोकलने प्रवास करु शकतात.
  • महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी( MCGM,MBMC,VVMC,TMC,KDMC,Palghar municipal corporation) त्याचप्रमाणे महापालिका शाळांचे शिक्षक व पालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करता येणार आहे.
  • महाराष्ट्र पोलीस, त्याचबरोबर मुंबई पोलीस आणि GRP कर्मचारी लोकलने प्रवास करु शकतात.
  • बेस्टच्या कर्मचाऱ्यांनाही मुंबई उपनगरीय लोकलने प्रवास करता येणार आहे. त्याचबरोबर MSRTC,MBMT,VVMT,NMMT,TMT,KDMT चे कर्मचारी सुद्धा मुंबई उपनगरीय लोकलने प्रवास करु शकतील.
  • केंद्र सरकारचे( Central Govt) सर्व कर्मचारी आणि केंद्र सरकारच्या पीएसयू (PSUs) च्या कर्मचाऱ्यांना मुंबई उपनगरीय लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
  • संरक्षण कर्मचारी, आयकर विभाग, जीएसटी, सीमा शुल्क, पोस्ट विभागाचे कर्मचारी, मुंबई पोस्ट, न्यायपालिका आणि राजभवनातील कर्मचारी लोकलने प्रवास करु शकतात.
  • वैद्यकीय क्षेत्रातील सर्व कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्यात परवानगी देण्यात आली आहे. डॉक्टर,फार्मा मेडिकल, लॅब टेक्निशिअन्स, हॉस्पिटल आणि मेडिकल क्लिनिक स्टॉफल लोकलने प्रवास करु शकतात. त्याचप्रमाणे सरकारी रुग्णालयातील कर्मचारी, खागसी रुग्णालयातील कर्मचारी, फार्मा स्टाफ, लॅब टेस्टमधील कर्मचारी लोकलने प्रवास करु शकतात.
  • वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असलेल्या व्यक्ती लोकलने प्रवास करु शकतात. त्याचबरोबर आजारी व्यक्तीसोबत एक गरजू व्यक्ती लोकलने प्रवास करु शकते.

नवे कडक निर्बंध

राज्य सरकारने तयार केलेल्या नव्या निर्बंधांनूसार, लग्न समारंभात नियमांचे उल्लंघन केल्यास ५० हजार रुपये दंड आकरण्यात येईल. लग्नात फक्त २५ लोकांनाच प्रवेश असेल. २ तासात लग्न उरकावी लागणार आहेत. मुंबईत खासगी गाडीत ५० टक्के क्षमतेने प्रवास करता येणार आहे. खासगी कार्यालये १५ टक्के क्षमतेने सुरु राहतील. तर खासगी बसेसमध्येही ५० टक्के क्षमतेने प्रवास करता येणार आहे.


हेही वाचा – एसटी वाहतूक अत्यावश्यक सेवेसाठीच चालू राहणार – अनिल परब

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -