घरताज्या घडामोडीMaratha Reservation Result 2021: मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात दिरंगाई झाली...

Maratha Reservation Result 2021: मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात दिरंगाई झाली का? दरेकरांचा राज्य सरकारला प्रश्न

Subscribe

मराठा आरक्षणाच्या विषयावर महाविकास आघाडी सरकार हतबल

मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निकाल दिला आहे. मराठा आरक्षणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केला आहे. यामुळे मराठा समाजाला मोठा धक्का बसला आहे. तर मराठा आरक्षण रद्द झाल्याने आता राज्य सरकारवर टीकेची झोड उठली आहे. यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारकडून दिरंगाई झाली का? असा सवाल उपस्थित केला आहे. सुनावणीदरम्यान राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला. गायकवाड समितीच्या शिफारशी स्वीकारण्याजोग्या नाहीत असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

मराठा आरक्षणाच्या निकालावर प्रवीण दरेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यापुर्वी डिसेंबर २०२० मध्ये दरेकरांनी ईडब्लूएस संदर्भात भाष्य केले होते. त्याचाही उल्लेख यावेळी केला आहे. मराठा आरक्षणाच्या विषयावर महाविकास आघाडी सरकार हतबल झालं असल्याचे यापुर्वीच सांगतलं होते. राज्य सरकार याबाबत पुर्वीपासूनच साशंक होते, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात दिरंगाई झाली का? हा सर्वसामान्य नागरिक म्हणून माझा सरकारला प्रश्न असल्याचे प्रवीण दरेरकरांनी म्हटले आहे.

- Advertisement -

तर दरेकरांनी यापुर्वी डिसेंबर २०२० मध्ये आरक्षणावर प्रतिक्रिया दिली होती. यावेळी त्यांनी म्हटले होते की, माझ असे मत आहे की, आरक्षणाच्या निर्णयामध्ये धोक्याची शक्यता असू शकते. ईडब्लूएसचे सर्वांसाठी आर्थिक आरक्षण होते राज्य सरकारने यामध्ये वेगळे काय केले? उलट पक्षी अशोक चव्हाणांना विचारले की, शासनाने ईडब्लूएसचा निर्णय घेत असताना न्यायालयाकडे विचारणा केली का? या ईडब्लूएसच्या आरक्षणानंतर मराठा समाजाच्या ईएससीबीसी चे काय होणार? यावर कोर्टाकडून स्पष्टता येणं महत्त्वाचे होते. सरकारच्या भूमिकेवर आम्हाला संशय येतो आहे. आरक्षणाचा निर्णय काय होईल याबाबत विश्वासू नाही. यामुळे ईडब्लूएस आरक्षण देऊन मराठा समाजाचा आक्रोश कमी व्हावा यासाठी पाऊल उचलले आहे. परंतु हे सर्व करताना मराठा आरक्षण जाता कामा नये यासाठी समाजाला आश्वस्त करण्चाची आवश्यकता आहे. अशी प्रतिक्रिया दरेकरांनी डिसेंबर २०२० मध्ये दिली होती. त्यामुळे महाविकास आघाडी मराठा आरक्षणावर हतबल झाली असल्याचे दरेकरांनी यापुर्वीच सांगिले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -