घरCORONA UPDATEcorona vaccination : केंद्राचा मोठा निर्णय, हाफकीनमध्ये वर्षाला २२.८ कोटी कोव्हॅक्सिन लसींचे...

corona vaccination : केंद्राचा मोठा निर्णय, हाफकीनमध्ये वर्षाला २२.८ कोटी कोव्हॅक्सिन लसींचे उत्पादन

Subscribe

देशांतर्गत लसीकरणाचा वेग वाढण्यासाठी केंद्र सरकारचे धोरण

देशात कोरोना संसर्गाची तिसरी लाट रोखण्यासाठी आता केंद्रीय आरोग्य यंत्रणेकडून लसीकरण मोहिमेवर अधिक भर दिला जात आहे. मात्र लसींच्या पुरवठ्यांपेक्षा मागणी जास्त असल्याने अनेक राज्यांमध्ये लसीकरण मोहिम सुरु ठेवण्यात अडचणी निर्माण होत आहेत. यापार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने देशातंर्गत लसीकरण मोहिम सुरळीत सुरु ठेवण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. केंद्राने महाराष्ट्रातील हाफकीन औषध निर्मित संस्थेत वर्षाला २२.८ कोटी कोव्हॅक्सिन लसींचे उत्पादन करण्याचे निर्णय घेतला आहे.

देशातील तीन औषध निर्मिती संस्थांची मदत 

लसीकरणासाठी पात्र असणाऱ्या संपूर्ण लोकसंख्येचे लवकरात लवकर लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवून केंद्र सरकारच्या मदतीने देशांतर्गत लस उत्पादनाचा वेग सातत्याने वाढविण्यात येत आहे. यासाठी देशातंर्गत लसींचे अधिकाधिक उत्पादन करण्यासाठी केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत ३.० कोविड सुरक्षा अभियानाअंतर्गत केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने तीन सरकारी उद्योगांची मदत घेतली आहे. यात मुंबईतील हाफकिन बायोफार्मास्युटीकल्स कॉर्पोरेशनसह हैदराबादमधील इंडियन इम्युनॉलॉजिकल्स आणि उत्तरप्रदेशातील बुलंदशहर भारत इम्युनॉलॉजिकल्स अँड बायोलॉजिकल्स औषध निर्मिती कंपन्यांच्या समावेश आहे.

- Advertisement -

परळमधील हाफकिनमध्ये होणार कोव्हॅक्सिनची निर्मिती 

हैदराबाद येथील भारत बायोटेक कंपनीशी केलेल्या तंत्रज्ञान हस्तांतरण व्यवस्थेअंतर्गत हाफकिन बायोफार्मा ही महाराष्ट्र राज्य सरकारची सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी कोव्हॅक्सिन लसीच्या उत्पादनासाठी पूर्वतयारी करीत आहे. हे उत्पादन हाफकिन कंपनीच्या परळ येथील संकुलात सुरु केले जाणार आहे.

याविषयी माहिती देताना, हाफकिन बायोफार्माचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.संदीप राठोड म्हणाले की एका वर्षात कोव्हॅक्सिन लसीच्या २२.८ कोटी मात्रांचे उत्पादन करण्याची तयारी कंपनीने दर्शविली आहे. कोव्हॅक्सिन लसीच्या उत्पादनासाठी हाफकिन बायोफार्मा कंपनीला केंद्र सरकारकडून ६५ कोटी रुपयांचे तर महाराष्ट्र राज्य सरकारकडून ९४ कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

- Advertisement -

“आम्हाला या कामासाठी आठ महिन्यांचा कालावधी मंजूर करण्यात आला असून लस उत्पादनाचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. लस उत्पादनाची प्रक्रिया दोन टप्प्यांची आहे – महत्त्वाचा औषधी भाग आणि अंतिम औषध उत्पादन. लसीसाठीचा महत्त्वाचा औषधी भाग तयार करण्यासाठी आम्हाला जैव सुरक्षा पातळी ३ (BSL 3) ची यंत्रणा निर्माण करण्याची गरज आहे, तर फिल फिनिश अर्थात अंतिम औषध उत्पादनाची यंत्रणा हाफकिनकडे यापूर्वीच स्थापन झालेली आहे,” असे वैद्यकीय शाखेची पदवी घेतल्यानंतर भारतीय प्रशासन सेवेत प्रवेश केलेले राठोड म्हणाले.

BSL 3 ही सुरक्षा प्रमाणन यंत्रणा असून ती प्रामुख्याने सूक्ष्म जंतूंचा वापर केल्या जाणाऱ्या कामाच्या ठिकाणी आवश्यक असते. अन्यथा श्वासाद्वारे सूक्ष्म जंतूचा शरीरात प्रवेश होऊन गंभीर आजार होऊ शकतात. असेही डॉ.संदीप राठोड म्हणाले.

बायोफार्मास्युटीकल्स कॉर्पोरेशन मर्या. ही कंपनी, प्लेगच्या आजारावरील लसीचा शोध लावणाऱ्या डॉ. वाल्देमर हाफकिन या रशियन सूक्ष्मजंतूशास्त्रज्ञाच्या नावावरून नामकरण करण्यात आलेल्या आणि 122 वर्षांची परंपरा असणाऱ्या हाफकिन संस्थेची शाखा आहे.


coronavirus : कोरोनामुक्त लहान मुलांना नव्या आजाराचा धोका, २ ते ६ आठवडे काळजी घ्या


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -