घरमहाराष्ट्रनाशिक५२५ जणांचे नेत्रदानाने २५९ जणांना मिळाली दृष्टी

५२५ जणांचे नेत्रदानाने २५९ जणांना मिळाली दृष्टी

Subscribe

७५९१ रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेद्वारे दृष्टीलाभ

कोरोनाच्या बिकट परिस्थितीत आरोग्याबाबत नाशिक जिल्ह्यात प्रभावी जनजागृती झाली असल्याचे नेत्रदानाच्या आकडेवारीवरुन समोर आले आहे. जिल्ह्यातील आठ नेत्रपेढ्यांमध्ये सव्वादोन वर्षांत तब्बल ५२५ जणांनी नेत्रदान केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील २५९ रुग्णांच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश आला आहे.

डोळा हा मानवी शरीराचा मुख्य अवयव आहे. दृष्टी नसेल तर निसर्गाने निर्माण केलेले सुंदर जग पाहता येत नाही. नेत्रविशारद डॉ. रामचंद्र भालचंद्र यांच्या स्मृतिपीत्यर्थ १० जून हा दिवस दृष्टिदान दिन म्हणून साजरा केला जातो. मृत्यूनंतर नेत्रदान करावे, याच्या प्रचारासाठी नाशिक शहरात आठ नेत्रपेढ्या आहेत. या ठिकाणी डोळे दान केले जात असून, डोळे सुरक्षितरित्या जतन केले जात आहेत. शिवाय गरजेनुसार रुग्णांना डोळ्यांचे प्रत्यार्पणसुद्धा केले जाते. जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या व दुसर्‍या लाटेत धुमाकूळ घातला. कोरोनामुळे अनेकांना जीव गमवावा लागला. तर अनेक कोरोनामुक्त झाल्यानंतर बुरशीजन्य म्युकरमायकोसिस आजाराला सामोरे जावे लागले. जिल्ह्यात एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ मध्ये २१३, एप्रिल २०१९ ते मार्च २०२० मध्ये २३५ आणि एप्रिल ते ९ जूनअखेर ७७ जणांनी नेत्रपेढ्यांकडे डोळे दान केले.

या ठिकाणी होते नेत्रदान

नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालय, तुळसी आय हॉस्पिटल,नाशिक, एमव्हीपी मेडिकल हॉस्पिटल,नाशिक, सुशील आय हॉस्पिटल,नाशिक,नीलवसंत मेडिकल फाउंडेशन आय बँक,नाशिक, डॉ. बापये आय बँक, नाशिक, डॉ. बी. एस. मूंजे आय बँक,नाशिक, रोटरी आय बँक, मालेगाव या नेत्रपेढ्यांमध्ये नेत्रदामाची सुविधा उपलब्ध आहे.

७५९१ रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेद्वारे दृष्टीलाभ

कोरोनाकाळात जिल्ह्यात दोन वर्षांमध्ये ७ हजार ५९१ रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेद्वारे दृष्टीलाभ झाला आहे. जिल्हा रुग्णालयात २०१९ मध्ये ३ हजार ९३८ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. तर २०२० मध्ये ३ हजार ६५३ रुग्णांना दृष्टी मिळाली.

म्युकरमायकोसिस आणि कोरोनामुळे आरोग्याच्या महत्व नागरिकांना समजू लागले आहे. म्युकरमायकोसिसमुळे अनेकांनी डोळे गमावले आहेत. त्यामुळे नागरिकांनी डोळ्यांची नियमित काळजी घ्यावी. वेळेवर औषधोपचार घ्यावा. काही त्रास जाणवल्यास तत्काळ डॉक्टारांशी संपर्क साधावा.
– डॉ. प्राची पवार, संचालिका, मणिशंकर आय हॉस्पिटल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -