घरताज्या घडामोडीSSC Result 2021: अकरावी प्रवेशासाठी CET परीक्षेची ऑनलाईन नोंदणी १९ जुलैपासून

SSC Result 2021: अकरावी प्रवेशासाठी CET परीक्षेची ऑनलाईन नोंदणी १९ जुलैपासून

Subscribe

CET परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेतली जाणार

राज्य मंडळाचा दहावीचा निकाल लागला. दहावीच्या निकालानंतर मुलांची सीईटी परीक्षांची तयारी सुरु होते. अकरावी सामायिक प्रवेश परीक्षांची (CET) तारीख बोर्डाकडून जाहीर करण्यात आली असून अकरावी प्रवेशासाठी CET परीक्षेची ऑनलाईन नोंदणी येत्या १९ जुलै म्हणजेच सोमवार पासून सुरु होणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली आहे. (SSC Result 2021: Online registration of CET exam for 11th admission from 19th July)  राज्य मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर परीक्षेचा अर्ज उपलब्ध आहे. अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीईटी परीक्षा ही OMR उत्तरपत्रिकांद्वारे घेण्यात येणार असून ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. सीईटी परीक्षा ही राज्य मंडळामार्फत घेण्यात येणार आहे. सीईटी परीक्षांचे अर्ज राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना विनामूल्य असतील. तर इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांना यासाठी शुल्क आकारण्यात येईल अशी माहिती दिनकर पाटील यांनी दिली.

 

- Advertisement -

ऑनलाईन नोंदणी कशी कराल?

  • राज्य मंडळाच्या अधिकृत वेबसाइट वर जा.
  • विद्यार्थ्यांचा दहावीचा आसन क्रमांक टाकून सीईटी परीक्षेचा अर्ज भरता येईल.
  • तिथे दहावीच्या निकालाचे गुण अपडेट केलेले असतील.
  • त्यानंतर पुढे तुमच्यासमोर परीक्षेसाठी इच्छुक आहात का? किंवा नाही असे दोन पर्याय समोर येतील. योग्य पर्याय निवडून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करा.

सीईटी परीक्षांचे स्वरुप कसे असेल?

सीईटी परीक्षा या अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येतात. मात्र ही वैकल्पिक म्हणजेच पर्यायी परीक्षा आहे. यात विचारले जाणारे प्रश्न हे दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असतात. ही परीक्षा OMR पद्धतीची असते. एकूण १०० गुणांच्या परीक्षेत बहुपर्यायी पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. परीक्षा देण्यासाठी २ तासांचा कालावधी देण्यात येतो. CET परीक्षांमध्ये मिळणाऱ्या गुणांच्या आधारे अकरावी प्रवेश प्रक्रियेला प्राध्यान्य देण्यात येते. त्याचप्रमाणे CET परीक्षांच्या गुणांच्या आधारे कॉलेजमध्ये प्रवेश दिला जातो.


हेही वाचा – ईएसबीएस कंपनीला भार उचलता आला नाही, मनस्ताप विद्यार्थ्यांना!

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -