घरताज्या घडामोडीNarayan Rane VS Shiv Sena: चिपळूणमध्ये शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमनेसामने

Narayan Rane VS Shiv Sena: चिपळूणमध्ये शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमनेसामने

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे (Narayan Rane controversial statement about cm uddhav thackeray). राज्यातील विविध भागांमध्ये शिवसैनिकांकडून नारायण राणे यांच्याविरोधात आंदोलन केले जात आहे. आज नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा चिपळूणमध्ये सहावा दिवस आहे. यादरम्यानच चिपळूणमध्ये शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले. (shiv sena and bjp party worker met face to face in jan ashirwad yatra) यावेळी दोन्ही गटांनी जोरदार घोषणबाजी केली. यादरम्यान कोणताही वाद होऊ नये यासाठी पोलिसांचा बॅरेगेटिंग केले होते.

चिपळूणमधील बहादूर शेख नाकाजवळ शिवसेना आणि भाजपमध्ये गोंधळ झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. तर दुसऱ्याबाजूला भाजपने ‘राणे साहेब अंगार है बाकी सब भंगार है’ अशा जोरदार घोषणा केल्या. या गोंधळाचे वादात रुपांतर होऊ नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. माहितीनुसार या गोंधळाच्या वेळी शिवसैनिकांनी नारायण राणे यांचे पोस्टर फाडले.

- Advertisement -

चिपळूण शिवाय औरंगाबादमध्ये क्रांती चौकात अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी नारायण राणे यांच्याविरोधात आंदोलन केले. यावेळी आंदोलनात कोंबड्या आणून नारायण राणे यांच्या फोटोला जोड्याने मारले. अशाप्रकारे राज्यातील विविध भागात नारायण राणे यांच्याविरोधात शिवसैनिकांकडून आंदोलन केले जात आहे.


हेही वाचा – Narayan Rane VS Shiv Sena: नाशिकमधील भाजप कार्यालयावर शिवसैनिकांकडून दगडफेक 

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -