घरट्रेंडिंगआधार कार्ड बनवणे झाले अधिक सोपे! मात्र त्यात बदल केल्यास 'नातं' बदलणार

आधार कार्ड बनवणे झाले अधिक सोपे! मात्र त्यात बदल केल्यास ‘नातं’ बदलणार

Subscribe

आधारकार्ड हे महत्वाचं कागदपत्रं म्हणून ओळखलं जातं. अनेक कामांच्या ठिकाणी आधारकार्डाचा उपयोग केला जातो. मात्र तुम्ही आधार कार्डमध्ये काही बदल करणार असाल तर तुमच्या वडिलांशी किंवा पतीशी असलेल्या नात्याची ओळख आता या कार्डमध्ये उघड होणार नाही. आधार कार्ड आता नाते संबंध उघड करणारे कागदपत्रं नाही. ते फक्त तुम्हाला ओळखण्याचे एक साधन राहणार आहे. दिल्ली पोलिसांचे निवृत्त उपनिरीक्षक रणधीर सिंह हे जेव्हा त्यांच्या पत्नीने तिच्या आधार कार्डमध्ये तिच्या घराचा पत्ता बदलल्यानंतर त्याचे नाव ‘वाइफ आफ’ ऐवजी ‘केअर आफ’ असे बदलले तेव्हा ते आश्चर्यचकित झाले.

निवृत्त उपनिरीक्षक रणधीर सिंह यांना पहिल्यांदा वाटले की, कंप्यूटर सिस्टम मधील समस्येमुळे हे घडले असावे. या प्रकारानंतर ते आधार कार्डची माहिती बदलण्यासाठी पोस्ट ऑफिस, बँक आणि इतर अनेक अधिकृत केंद्रांवर गेले, पण त्यांचे नाव सर्व ठिकाणी केयर आफ असे येत होते. सिंह यापूर्वी अशोक विहार पोलीस कॉलनीत राहत होते आणि निवृत्त झाल्यानंतर ते पितामपुरा येथे गेले आहेत. त्यामुळे ते आधार कार्डमधील कुटुंबातील सर्व सदस्यांचा पत्ता बदलण्यासाठी गेले. मुलाच्या आधार कार्डमध्ये बदल केल्यावर वडिलांच्या नावा ऐवजी तेथे केयर आफ असे येत होते.

- Advertisement -

आता आधारकार्ड बनवणे अधिक सोपे

मिळालेल्या माहितीनुसार, २०१८ मध्ये आधारबाबत सर्वोच्च न्यायालयाचा सविस्तर निर्णय घेण्यात आला होता. त्या निर्णयात, लोकांच्या गोपनीयतेबद्दल चर्चा करण्यात आली आहे आणि त्या आधारावर केवळ आधार कार्डमध्ये नाते संबंधांची माहिती दिली जात नाही. मात्र हा बदल कोणत्या वर्षाच्या कोणत्या महिन्यापासून करण्यात आला, याबाबतची माहिती UIDAI ने दिलेली नाही, असे भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी (UIDAI) च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. यासह आता अधिकृत आधारमध्ये कोणत्याही बदलासाठी आता आधार कार्डमध्ये पिता, मुलगा, मुलगी (वाइफ आफ, सन आफ, डॉटर आफ) त्याऐवजी केअर आफ आधार कार्डमध्ये छापले जात आहे. त्यामुळे आता आधारकार्ड बनवणे अधिक सोपे झाले आहे,  अशी माहिती आयटी मंत्रालयाअंतर्गत काम करणाऱ्या कॉमन सर्व्हिस सेंटरचे (सीएससी) व्यवस्थापकीय संचालक दिनेश त्यागी यांनी सांगितले.


कोण आहेत करुणा शर्मा ? धनंजय मुंडेशी काय आहे कनेक्शन?

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -