घरताज्या घडामोडीमुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करा, अन्यथा...

मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करा, अन्यथा…

Subscribe

रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाविरोधात पनवेलमध्ये आंदोलन

मागील अकरा वर्षापासून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे रखडलेले आहे. त्यामुळे महामार्गावर मागील ११ वर्षात सुमारे साडेतीन हजार अपघात होऊन अनेकांचा बळी गेलेला आहे. अशा नाकर्त्या प्रशासकीय यंत्रणेचा निषेध नोंदवून अपघातात मृत्यू पावलेल्या बांधवांना श्रद्धांजली अर्पण करून खड्डेमुक्त महामार्गाच्या मागणीसाठी आज मंगळवारी ७ सप्टेंबरला कोकण हायवे समन्वय समिती, ग्राम संवर्धन सामाजिक संस्था कोकण कट्टा रायगड जिल्हा मेडिकल रिप्रेझेन्टेटीव्ह संघटणेच्या वतीने पनवेल तालुक्यातील पळस्पे फाटा येथे मानवी श्रद्धांजली साखळीचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई – गोवा महामार्गाची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली असून, वारंवार हा प्रश्न उपस्थित करुनही रस्त्याचे काम अपूर्णच आहे.

मुंबईचे सर्व मार्ग बंद करण्याचा इशारा

मुंबई-गोवा महामार्गाला कोकणची ‘विकासरेषा’ म्हणून ओळखली जात असताना या महामार्गाचे रुंदीकरण होणे आवश्यक होते. परंतु एकही लोकप्रतिनिधी या विषयावर चकार शब्द बोलले नाहीत. आंदोलनाचे फळस्वरुप म्हणून रुंदीकरणाला सुरुवात झाली खरी परंतू आपल्याच सत्ताविलासात रमणारे राजकारणी आणि कोकणी माणसाशी काहीही घेणेदेणे नसणारे प्रशासकीय अधिकारी यांच्या नाकर्तेपणामुळे या रुंदीकरणाचे काम मागील अकरा वर्षापासून असताना ह्याच महामार्गावर मागील ११ वर्षात सुमारे साडेतीन हजार अपघात होऊन ५६७ नागरिकांचा बळी गेलेला आहे. पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांनी या आंदोलनाची दखल घेत आंदोलनस्थळी जावून आंदोलकांचे सोबत संवाद साधत निवेदन स्वीकारून संबंधित मागण्या वरिष्ठांपर्यंत पोहोचविण्याचे मान्य केले. यावेळी कोकण हायवे समन्वय समितीचे अध्यक्ष संजय यादवराव यांनी पुढील एक वर्षांत कोकण महामार्ग पूर्ण न केल्यास मुंबईचे सर्व मार्ग बंद करण्याचा इशारा दिला.

- Advertisement -

तर पहिल्या टप्प्यातील ८४ किलो मीटरसाठी सुरवातीला ९४२ कोटी रुपयांची प्रकल्प किंमत आज २००० कोटींपर्यंत होऊनही काम पूर्ण होत नाही याचा अर्थ हा महामार्ग भ्रष्टाचाराचे कुरण झाल्या मुळेच हा मार्ग पूर्ण केला जात नसल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

यावेळी कोकण हायवे समन्वय समितीचे रायगड जिल्हा समन्वयक ऍड.मंगेश नेने पेण तालुका समन्वयक निलेश म्हात्रे, अलिबाग तालुका समन्वयक, दिलीप जोग, मराठा सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश चांदीवडे, ग्राम संवर्धन सामाजिक संस्था, बांधनवाडी-पनवेलचे उदय गावंड उपस्थित होते.


हे ही वाचा – चिपी विमानतळाचे उद्घाटन ९ ऑक्टोबरला, नारायण राणेंची ‘कोकण’वासीयांसाठी मोठी घोषणा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -