घरताज्या घडामोडीbhavana gawali : भावना गवळींना वर्षावर नो एंट्री, मुख्यमंत्र्यांची अर्धा तास वाट...

bhavana gawali : भावना गवळींना वर्षावर नो एंट्री, मुख्यमंत्र्यांची अर्धा तास वाट बघून भेटीशिवायच परतल्या

Subscribe

शिवसेना खासदार भावना गवळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाल्या होत्या.

ईडीच्या रडारवर असलेल्या वाशिम-यवतमाळ मतदार संघाच्या खासदार आणि शिवेसना नेत्या भावना गवळी यांना वर्षावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भेट नाकारली आहे. अर्धा तास वर्षाच्या बाहेर भावना गवळी भेटीसाठी वाट पाहत होत्या परंतु त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट न घेताच पुन्हा परतल्या आहेत. भावना गवळी यांच्या शैक्षणिक संस्थांवर ईडीकडून छापेमारी करण्यात आली असून त्यांचा निकटवर्तीय सईद खानला अटक करण्यात आलं आहे. भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी भावना गवळी यांच्यावर १०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला असून भावना गवळींवर ईडीची कारवाई सुरु केली आहे. तसेच भावना गवळींनी आपल्यावर हल्ला करण्यास सांगितल्याचा आरोप करुन सोमय्यांकडून अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.

शिवसेना खासदार भावना गवळी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाल्या होत्या. परंतु भावना गवळी यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भेट दिली नसल्यामुळे अखेर त्या पुन्हा परतल्या आहेत. भावना गवळी या वर्षा बंगल्याच्या बाहेर अर्धा तास वाट बघत होत्या परंतु मुख्यमंत्र्यांशी भेट झाली नाही. भावना गवळी रिकाम्या हाती परतल्यामुळे गवळींना भेट नाकरल्याची चर्चा सुरु झाली आहे.

- Advertisement -

भावना गवळींवर भ्रष्टाचाराचा आरोप

भावना गवळी यांनी संस्थेतून ७ कोटी रुपये चोरी झाल्याची तक्रार केली होती. यानंतर भाजप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी भावना गवळी यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केला होता. गवळी यांच्या ट्रस्टमध्ये १७ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याप्रकरणी ईडीने तपास सुरु केला आहे. कथित गैरव्यवहार प्रकरणी भावना गवळी यांच्याविरोधात सामाजिक कार्यकर्ते हरिष सारडा यांनी तक्रार केली होती. बालाजी सहकारी पार्टिकल बोर्डानं ४३.३५ कोटी रुपयांचे कर्ज एनसीडीसीकडून कर्ज घेतलं आहे. परंतु ही कंपनी सुरुच झाली नसल्याचा आरोप हरिष सारडा यांनी केला आहे. तसेच भावना अॅग्रो प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस कंपनीने वेगवेगळ्या बँकांमधून कर्ज ७.५ कोटी रुपयांचे कर्ज घेतं होते. यानंतर ही कंपनी खासगी सचिवाला ७.९ कोटी रुपयांना विकल्याचा आरोप करण्यात आला आहे.


हेही वाचा : NCBची मुंबईत मोठी कारवाई; रजाईतून ऑस्ट्रेलियाला पाठवले जाणारे ड्रग्स जप्त

- Advertisement -

 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -