घरताज्या घडामोडीस्थलांतरित पक्ष्यांमुळे नवी मुंबई विमानतळावर परिणाम ; पाणथळ क्षेत्रातला पक्ष्यांचा अभ्यास सक्तीने...

स्थलांतरित पक्ष्यांमुळे नवी मुंबई विमानतळावर परिणाम ; पाणथळ क्षेत्रातला पक्ष्यांचा अभ्यास सक्तीने थांबविला

Subscribe

अज्ञातांनी संरक्षित स्थलांतरित पक्ष्यांना घाबरवून पळविण्यासाठी फटाके फोडले होते

सिडकोने बीएनएचएसवर ३०० हेक्टर क्षेत्रातल्या पाणजे पाणथळ क्षेत्रात येणार्‍या स्थलांतरीत पक्ष्यांच्या उड्डाण प्रकाराचे (बर्ड फ्लाईट पॅटर्न) सर्वेक्षण नवी मुंबई सेझच्या सुरक्षा कर्मचार्‍यांच्या सक्तीमुळे थांबविण्यात आले असून, या धक्कादायक घटनेवर राज्याच्या मुख्यमंत्र्यानी हस्तक्षेप करावा, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.बीएनएचएसचे हे सर्वेक्षण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील उड्डाणांवर होणार्‍या प्रभावाचा अभ्यास करण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. या विमानतळाची सेवा येत्या ३ वर्षांमध्ये सुरू होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच दिली आहे. या पाणथळीत दरवर्षी दीड लाखांहून अधिक स्थलांतरित आणि स्थानिक पक्षी भेट देतात. येथे येणार्‍या पक्ष्यांना विमानाच्या उड्डाणांमुळे त्रास होऊ शकतो किंवा पक्षी विमानांना धडकू शकतात, असा निष्कर्ष बीएनएचएस आणि पर्यावरण तज्ज्ञांनी काढला होता.

त्यामुळे पाणजे पाणथळ क्षेत्राचे जैवविविधता उद्यान (बायोडायव्हर्सिटी पार्क) म्हणून संवर्धन करण्याच्या संकल्पनेला तडा जाणार होता. बीएनएचएस शास्त्रीय टीम्स, पत्रकार, निसर्ग छायाचित्रकार आणि स्थानिक मच्छीमार यांना नवी मुंबई सेझ सुरक्षेकडून, तसेच काही स्थानिक स्वार्थी लोकांकडून पाणथळ क्षेत्रात प्रवेश करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.बीएनएचएसचे संचालक डॉ. बिवाश पांडव पाणजे पाणथळ क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी गेले असताना त्यांना देखील तेथून हाकलण्यात आले.नॅटकनेक्टचे संचालक बी. एन. कुमार म्हणाले, ही अतिशय गंभीर समस्या आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना या धोक्याची कल्पना दिली असून, पाणजे पाणथळ क्षेत्राचे संवर्धन करण्याची विनंती केली आहे.
पाणजे येथील एनएमएसइझेड सुरक्षा कक्ष देखील अनधिकृत आहे आणि राज्य पर्यावरण संचालकांनी प्रकल्पाचे सीइओ आणि सिडकोला नोव्हेंबर २०२० मध्ये त्यांना कक्ष तोडण्याचे आदेश दिले होते. तरी देखील कक्ष आणि सुरक्षेवर काडीमात्र परिणाम झाला नसल्याचे कुमार यांनी सांगितले. पाणथळ क्षेत्र उद्ध्वस्त करण्याचा आणखीन एक प्रयत्न म्हणजे काही अज्ञातांनी संरक्षित स्थलांतरित पक्ष्यांना घाबरवून पळविण्यासाठी फटाके फोडले होते, असे श्री एकवीरा आई प्रतिष्ठानचे प्रमुख नंदकुमार पवार यांनी सांगितले.

- Advertisement -

बीएनएचएस नावाजलेली संस्था असून, पर्यावरण, तसेच पश-पक्ष्यांच्या जीवनावर अभ्यास करीत असते. सिडकोने त्यांना या ठिकाणचा अभ्यास करण्यासाठी नेमले आहे. एमटीएचएलच्या न्हावा-शिवडी सागरी सेतूमुळे सागरी जैव विविधतेवर होणारा परिणाम याविषयी अभ्यास करण्यासाठी देखील एमएमआरडीएने या संस्थेची नेमणूक केली आहे.


हे ही वाचा – Uttarakhand Weather Update: पूर-पाऊस, भूस्खलनामुळे उत्तराखंडला मोठा फटका; आतापर्यंत ४७ जणांचा मृत्यू

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -