घरताज्या घडामोडीमाथेरानच्या विकासात रोजगार निर्मितीही - आदित्य ठाकरे

माथेरानच्या विकासात रोजगार निर्मितीही – आदित्य ठाकरे

Subscribe

शहराचा विकास करताना पारंपारिक व्यवसायाला कुठे धक्का लागणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन

देश-विदेशातील पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या माथेरानचा विकास करताना रोजगार निर्मितीही करायची असल्याचे प्रतिपादन राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकाराने शहरात झालेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण, तसेच काही कामांचे भूमिपूजन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते रविवारी पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. माथेरानचे वैभव असलेली लाल माती आणि जांभा दगडाचे रस्ते येथील पर्यटनला नवी दिशा देणारे ठरतील, असा विश्वास व्यक्त करतानाच शहरातील रुग्णालय अद्ययावत करण्याचा मनोदय त्यांनी बोलून दाखविला.

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी माथेरानमध्ये पर्यटक अधिक संख्येने यावेत यासाठी पर्यटन विभागाने अनेक प्रकल्प आणण्याची गरज व्यक्त करून पर्यटन विभागाबरोबर नगरविकास विभाग आणि एमएमआरडीएकडून अधिक निधी मिळावा, अशी मागणी केली. त्याचप्रमाणे या शहराचा विकास करताना पारंपारिक व्यवसायाला कुठे धक्का लागणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. तर प्रास्ताविकात नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी शहराचा विकास हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याने होऊ शकल्याचे सांगितले. शहरातील जलोस्तोत्र वाढविण्याच्या दृष्टीने सिमंसेन टँकला पुनर्जीवन देण्यासाठी राज्य शासनाने लक्ष देण्याची विनंतीही केली. उद्योग मंत्री सुभाष देसाई, तसेच कर्जत-खालापूर शिवसेनेचे समन्वयक राजेश कृतीक यांचे देखील सहकार्य लाभल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. जिल्हा प्रशासनाने बनविलेल्या भित्तीपत्रके आणि घडी पत्रकांचे प्रकाशन ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

- Advertisement -

यानिमित्ताने नगर परिषदेच्या सभागृहाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सभागृह असे नामकरण करण्यात आले. यावेळी माथेरानचे ब्रँड अ‍ॅम्बॅसिडर आदेश बांदेकर, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, स्थानिक खासदार श्रीरंग बारणे, स्थानिक आमदार महेंद्र थोरवे, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोहर भोईर, जिल्हा आघाडी संघटक रेखा ठाकरे, शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी, गटनेते प्रसाद सावंत, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजय सावंत, माजी नगराध्यक्ष विवेक चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन मल्हार पवार, तर आभार प्रदर्शन मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी केले.


हे ही वाचा – सॅम डिसुजा मनी लाँड्रिंगमधील मोठा खिलाडी; इंटरवलनंतर मी गोष्टी समोर आणणार – संजय राऊत

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -