घरCORONA UPDATECovid Death: कोरोना काळात जगभरात आतापर्यंत ५० लाख मृत्यू

Covid Death: कोरोना काळात जगभरात आतापर्यंत ५० लाख मृत्यू

Subscribe

भारतात आतापर्यंत ४ लाखांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू

कोरोना महामारीने संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला. कोरोनामुळे संपूर्ण जग हादरुन गेलं. कोरोना काळात अनेक देशांची दयनीय अवस्था झाली आहे. अनेक देश आजही कोरोनाच्या लाटेचा सामना करत आहेत. अनेक देश आजही लॉकडाऊनमध्ये आहेत. देशात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा समोर आला आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळे ५० लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिका,यूरोपीय संघ, ब्रिटेन आणि ब्राझीलसारखे मोठी लोकसंख्या असलेल्या देशात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूनी लोकसंख्या अर्धी झाली. मागील दोन वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून जवळपास ७.४० लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.

पीस रिसर्च इंन्स्टिट्यूट ओस्लोने दिलेल्या माहितीनुसार, १९५० पासून आतापर्यंत झालेल्या युद्धात देखील ५० लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. ७० वर्षात झालेल्या मृत्यूइतकेच मृत्यू कोरोना काळात झाले आहेत. हार्ट अटॅक आणि ब्रेन हॅम्रेजमुळे नंतर कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत.

- Advertisement -

भारतात आतापर्यंत ४ लाखांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय तर अमेरिकेत ७ लाखांहून अधिक लोकांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. ब्राझीलमध्ये आजही कोरोनाचा कहर कायम असून आतापर्यंत ६ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

जगभरातील कोरोनावर मात करण्यासाठी कोरोना विरोधी लसीकरणाने चांगलाच वेग घेतला आहे. पाकिस्तानसारख्या देशात आजही लाखो नागरिकांचे लसीकरण बाकी आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये सध्या कोरोनाची पाचवी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अनेक देशांमध्ये कोरोना विरोधी लसींचा बुस्टर डोस देण्यात येत आहेत. श्रीलंकन सरकार देखील आरोग्य कर्मचारी किंवा पर्यटन क्षेत्राशी निगडीत नागरिकांना फायझर लसीचा बुस्टर डोस देत आहेत.

- Advertisement -

दक्षिण कोरियात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेले अनेक निर्बंध काढून टाकण्यात आले आहेत. मात्र कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी जाण्यासाठी लसीकरण प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. मागील १८ महिन्यांमध्ये थायलँड आणि इस्राइल सारख्या देशांमध्ये अनेक नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. थायलँडने अमेरिका आणि चीन सोबतच ६० देशातील लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांना प्रवास करण्यासाठी परवानगी दिली आहे.


हेही वाचा – COP26: भारत २०७० सालापर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य गाठेल, पंतप्रधान मोदींची ग्वाही

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -