घरदेश-विदेशCOP26 : भारत २०७० सालापर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य गाठेल, पंतप्रधान मोदींची...

COP26 : भारत २०७० सालापर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य गाठेल, पंतप्रधान मोदींची ग्वाही

Subscribe

ग्लासगो येथील संयुक्त राष्ट्रांच्या सीओपी-२६ या जागतिक हवामान परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत २०७० पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य गाठेल अशी ग्वाही दिली आहे. तसेच भारत गैर-जीवाश्म उर्जा क्षमता ५०० गिगावॉटपर्यंत वाढवण्यावर भर देईल तसेच २०३० पर्यंत अक्षय उर्जेद्वारे आपली ५० टक्के उर्जेची गरज पूर्ण करेल असा विश्वास जागतिक नेत्यांसमोर व्यक्त केला.

सीओपी २६ परिषदेत सहभागी जागतिक नेत्यांसमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केले, यावेळी बोलताना त्यांनी पुढील पिढीला जागरुक करण्यासाठी हवामान बदलाबाबतच्या धोरणांचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले तसेच परिस्थितीतीनुसार बदल हा विकास धोरणांचा आणि योजनांचा मुख्य भाग बनवावा लागेल, यात भारत नल से जल, क्लीन इंडिया मिशन आणि उज्वला योजनांच्या माध्यमातून नागरिकांचा फायदा झालाय याशिवाय भारतीयांचे जीवनमान उंचावले.असे नमूद केले.

- Advertisement -

यात हवामान बदलांच्या संकटाला तोंड देताना केवळ संकटाचे निराकारण करण्यावर भर न देता रुपांतरनावर भर दिला पाहिजे. असे मत व्यक्त केले, यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी मोदींच्या आधी भाषण करत विकसनशील देशांना स्वच्छ ऊर्जानिर्मितीसाठी मदत करण्याची ग्वाही दिली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्या हस्ते सीओपी-२६ या जागतिक हवामान परिषदेचे उद्घाटन झाले. यावेळी जॉन्सन यांनी पृथ्वीच्या सद्यस्थितीची तुलना बॉण्डपटाच्या कथेशी केली आहे.

भारतातील हरित प्रकल्पांसाठी जागतिक बँकेकडून अतिरिक्त ७५० दशलक्ष पौंडच्या मदतीसाठी ब्रिटन हरित हमी देईल अशी घोषणा सीओपी-२६ परिषदेत करण्यात आली आहे. ब्रिटनच्या हरित हमीमुळे भारतातील स्वच्छ ऊर्जा, वाहतूक आणि नागरी विकास क्षेत्रात स्वच्छ पायाभूत सुविधांना चालना मिळेल असे सांगण्यात येतेय.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -