घरक्रीडाIND vs NZ: अश्विनने रेकॉर्ड तोडत हरभजन सिंगला टाकलं मागे, भज्जीने केलं...

IND vs NZ: अश्विनने रेकॉर्ड तोडत हरभजन सिंगला टाकलं मागे, भज्जीने केलं अभिनंदन

Subscribe

भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने आज(सोमवार) भारताचा माजी खेळाडू हरभजन सिंगला मागे टाकलं आहे. भारताकडून कसोटी क्रिकेटसाठी अश्विन तिसरा यशस्वी गोलंदाज ठरला आहे. हरभजन सिंगने अश्विनला आपला रेकॉर्ड तोडल्यामुळे त्यांचं अभिनंदन देखील केलं आहे. हरभजनने सोशल मीडियाच्या माध्यमातून अश्विनला टॅग देखील केलं आहे. बधाई अश्विन भाई आपको ढेर सारी शुभकामनाएं। भगवान भला करे। चमकते रहो, अशा प्रकारचं ट्विट भज्जीने अश्विनला केलं आहे.

हरभजन सिंगने ट्विट करत लिहिलंय की, अश्विनला तुला खूप साऱ्या शुभेच्छा, देव तुझं भलो करो आणि असाच पुढे चमकत रहा. अशा प्रकारचं ट्विट सिंगने केलं आहे.

- Advertisement -

सोमवारी कानपुरमध्ये झालेल्या न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पाचव्या दिवसांमध्ये भारताने कमाल केली आहे. शेवटच्या दिवशी सामन्यात भारताला मोठं यश मिळालं. कसोटी सामन्यात त्याने जवळपास ४१८ विकेट घेतले आहेत. तर किवी गोलंदाजीमध्ये टॉम लाथमने ५२ धावाच्या सरासरीमद्ये ४१८ जणांचा बळी घेतला आहे. त्याचसोबतच हरभजन सिंगला मागे टाकत कसोटी क्रिकेट सामन्यामध्ये भज्जीने ४१७ विकेट्स घेतले आहेत.

- Advertisement -

अश्विनच्या पुढे अनिल कुंबळे आणि कपिल देव –

कसोटी क्रिकेट सामन्यांमध्ये अश्विनने हरभजन सिंगला मागे टाकलं आहे. परंतु भारताचे माजी खेळाडू अनिल कुंबळे आणि कपिल देव यांना मागे टाकणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण या दोन्ही खेळाडूंनी सर्वात जास्त गडी बाद केले आहेत. त्यांच्या नावावर १३२ कसोटी सामन्यांमध्ये ६१९ विकेट प्राप्त केले आहेत. तस दुसऱ्या स्थानावर कपिल देव आहेत. त्यांनी १३१ कसोटी सामन्यांमध्ये ४३४ गडींना बाद केलं आहे. अश्विन कपिल देव यांचा रेकॉर्ड सहज तोडू शकतो. परंतु अनिल कुंबळे यांचा रेकॉर्ड तोडण्यासाठी त्याला अजून कठीण परिश्रम करावे लागणार आहेत.

कसोटी क्रिकेटमधील भारतात सर्वात जास्त विकेट घेणारे गोलंदाज –

१) अनिल कुंबळे – ६१९

२) कपिल देव – ४३४

३) रविचंद्रन अश्विन – ४१८

४) हरभजन सिंग – ४१७

५) इशांत शर्मा – ४११


हेही वाचा : Mamata Banerjee Mumbai Visit : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबईत दाखल, कसा असेल दोन दिवसीय दौरा?


कसोटी सामन्यांमध्ये १३ वा गोलंदाज ठरला अश्विन

४१८ गडी बाद करत कसोटी अश्विन १३ वा क्रिकेटपटू ठरला आहे. कसोटी सामन्यांमध्ये सर्वात जास्त विकेट घेणारा आणि रेकॉर्ड तोडणारा श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुथैया मुरलीधरन आहे. त्याच्या नावावर १३३ कसोटी सामन्यांपैकी ८०० विकेट घेतले आहेत. शेन वॉर्न कसोटी क्रिकेटमध्ये दुसरा यशस्वी खेळाडू ठरला आहे.

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -