घरताज्या घडामोडीकोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २५ हजार व्यक्तींना मध्य रेल्वेने ठोठावला दंड ; १२३.३१...

कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २५ हजार व्यक्तींना मध्य रेल्वेने ठोठावला दंड ; १२३.३१ कोटी रुपयांची विक्रमी वसुली

Subscribe

मध्य रेल्वेने कोविड-१९ प्रोटोकॉलचे पालन करताना सरकारच्या निर्देशांनुसार प्रवाशांना प्रवास करताना सर्व खबरदारी घेण्यास संवेदनशील बनवताना, चुकीच्या प्रवाशाला दंड करण्यात अतिशय तत्पर आणि कुशलतेने काम केले आहे, ज्यामुळे रेल्वेला मोठे महसूल प्राप्त झाले आहे. १ एप्रिल २०२१ ते ३० नोव्हेंबर  २०२१ या कालावधीत, तिकीट तपासणी कर्मचार्‍यांच्या विशेष पथकांनी कोविड-१९ योग्य वर्तनाचे पालन करीत नसलेल्या एकूण २४,९४४ व्यक्तिंना शोधून त्यांना दंड ठोठावला आणि ४१.२८ लाख रुपयांची रक्कम दंड म्हणून वसूल करण्यात आली.

अनधिकृत प्रवासाला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेच्या धडक मोहिमेमुळे दि. १.४.२०२१ ते ३०.११.२०२१ या कालावधीत २०.६८ लाख प्रकरणांमधून १२३.३१ कोटींची महसूल प्राप्त झाले आहे. नोव्हेंबर-२०२१ मध्ये, बुक न केलेल्या सामानासह अनधिकृत/अनियमित प्रवासाची ४.५२ लाख प्रकरणे आढळून आली आणि दंड म्हणून रु. ३० कोटी वसूल करण्यात आले.

- Advertisement -

श्री अनिल कुमार लाहोटी, महाव्यवस्थापक यांनी प्रवाशांना कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी वैध तिकिटांसह प्रवास करण्याचे आणि कोविड-१९ साठी अनिवार्य केलेल्या सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

भाडे-व्यतिरिक्त महसुलात मध्य रेल्वे क्रमांक एक

मध्य रेल्वेने एप्रिल ते नोव्हेंबर-२०२१ या कालावधीत भाडे-व्यतिरिक्त महसूल म्हणून रु. १४.५७ कोटींचे योगदान दिले असून ते सर्व क्षेत्रीय रेल्वेंमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत हे प्रमाण ३५० % अधिक आहे.

- Advertisement -

भाडे-व्यतिरिक्त महसुल (नॉन-फेअर रेव्हेन्यू)चे काही प्रमुख उपक्रम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोकमान्य टिळक स्थानकांवर डिजिटल क्लोक रूम, ॲप आधारित व्हील चेअर सुविधा, डब्यांच्या आत जाहिराती, लोकल ट्रेन, होर्डिंग साइट इ. आहेत.

बोनाफाईड रेल्वे वापरकर्त्यांना चांगली सेवा देण्याच्या आणि विनातिकीट प्रवासाला आळा घालण्याच्या प्रयत्नात मध्य रेल्वेने नियमितपणे उपनगरीय आणि उपनगरीय / मेल एक्सप्रेस विशेष गाड्यांमध्ये विनातिकीट आणि अनियमित प्रवासाविरुद्ध शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि कोविड-१९ च्या अनुषंगाने सखोल मोहीम राबवली आहे. आपले कर्तव्य बजावत असताना मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांच्या वागणुकीमुळे तक्रारी कमी झाल्या आहेत. त्यांनी अनेक प्रसंगी हरवलेल्या मुलांना त्यांच्या पालकांसोबत एकत्र करून त्यांची सहृदयीपणा देखील दाखविले आहे.


हे ही वाचा – देशांतर्गत प्रवासासाठी RTPCR निगेटीव्ह असणं बंधनकारक, केंद्रीय आरोग्य सचिवांचे राज्याच्या आरोग्य विभागाच्या सचिवांना पत्र


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -