घरदेश-विदेशNagaland killings : जवानांनी मृतांचे कपडे बदलले, प्रत्यक्षदर्शीचा दावा

Nagaland killings : जवानांनी मृतांचे कपडे बदलले, प्रत्यक्षदर्शीचा दावा

Subscribe

नागालँडमध्ये लष्कराच्या गोळीबारात १४ नागरिकांचा मृत्यू झाल्यामुळे वातावरण दिवसेंदिवस तणावपूर्ण होतेय. या घटनेचे अनेक ठिकाणी पडसाद उमटतायत. अशातच लष्कराच्या जवानांनी गोळीबारनंतर ठार झालेल्या मृतांचे कपडे बदलण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. गोळीबाराचा आवाज ऐकून घटनास्थळी पोहचलेल्या काही ग्रामस्थ्यांच्या म्हणण्यानुसार, लष्कराने लोकांना मारल्यानंतर मृतदेहाचे कपडे बदलण्याचा प्रयत्न केला.

या गोळीबारात शोमवांग नावाच्या व्यक्तीचाही मृत्यू झाला होता. यावेळी घटनास्थळी पोहचलेल्या त्याचा बहिणीने सांगितले की, जेव्हा ती तिथे पोहचली तेव्हा तिला शोमवांग अर्धनग्न अवस्थेत दिसला. तर अनेक लोकांचे कपडे बदलण्यात आल्याचा दावा तिने केलाय.

- Advertisement -

किपवांग कोन्याक हा या घटनेचा प्रत्यक्षदर्शी असून गोळीबाराचा आवाज ऐकून तो घटनास्थळी पोहोचला. त्याने आज तक या वृत्तवाहिनीला सांगितले की, जेव्हा तो घटनास्थळी पोहोचला तेव्हा त्याला एक वेगवान पिकअप व्हॅन तेथून निघताना दिसली. स्थानिक लोकांनी व्हॅनचा पाठलाग केला तेव्हा त्यांना तेथे लष्कराच्या जवानांची आणखी तीन वाहने असल्याचे दिसून आले. त्यांनी सांगितले की, ते कपडे बदलण्याचा प्रयत्न करत होते. जेव्हा ही घटना चुकीच्या माहितीच्या आधारे झालीय तर लष्करी जवान मृतांचे कपडे बदलण्याचा प्रयत्न का करत आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

स्थानिकांनी शोमवांगच्या कारमध्ये गोळ्यांच्या खूणा आणि रक्ताचे डाग पाहिले होते, त्यामुळे त्यांना काहीतरी गडबड असल्याचा संशय आला. त्यानंतर त्यांनी वाहनांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांना दुसरी पिकअप व्हॅन सापडली ज्यामध्ये मृतदेह ताडपत्रीने झाकून ठेवण्यात आले होते. मृतदेहांसह ट्रकचा व्हिडिओ शूट करणार्‍या मनपेहने आज तक वृत्तवाहिला ही गोष्ट सांगितली आहे. त्यांनी सांगितले की, ‘जेव्हा आम्ही येथे पोहोचलो तेव्हा आम्हाला लष्कराच्या पिक-अप व्हॅनमध्ये मृतदेह ठेवलेले दिसले. हे बघून मला राग आला.

- Advertisement -

नागालँडमधील मोन जिल्ह्यातील ओटिंगच्या तिरू गावात शनिवारी कोळशाच्या खाणीतून परतणारे मजूर लष्कर जवानांच्या गोळीबारात ठार झाले. स्थानिक लोकांनी सांगितले की, मजूर दर शनिवारी तिरू गावातूनच ओटींगला परतायचे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, जेव्हा तो तेथे पोहोचला तेव्हा त्याला तेथे जिवंत बॉम्बही दिसले.

विशेष म्हणजे या वृत्तवाहिनाला लष्कराच्या पिकअप व्हॅनचा नंबर दाखवणारा एक व्हिडिओही मिळाला आहे. ज्यामध्ये 6 मृतदेह ठेवण्यात आले होते. या सगळ्यामागचा उद्देश काय होता हे माहीत नसले तरी केंद्राच्या वक्तव्यावर नक्कीच प्रश्न उपस्थित झाले आहेत. नागालँड पोलिसांनी आपल्या अहवालात असेही लिहिले आहे की, ‘पिक-अप ट्रकमध्ये मृतदेह गुंडाळून लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला.’


st workers strike : एसटी कर्मचाऱ्यांचा ३० दिवसांचा विक्रमी संप, विलीनीकरणावर कर्मचारी ठाम


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -