घरCORONA UPDATEOmicron : ओमिक्रॉनचा कहर! वर्क फ्रॉम होम, मास्क अन् वॅक्सीन पास; 'या'...

Omicron : ओमिक्रॉनचा कहर! वर्क फ्रॉम होम, मास्क अन् वॅक्सीन पास; ‘या’ देशात नवे नियम लागू

Subscribe

जगभरात कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने कहर केला असून दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढतेय. आरोग्य तज्ज्ञांनी या व्हेरिएंटला डेल्टा व्हेरिएंटपेक्षा धोकादायक आणि अधिक वेगाने पसरणार असल्याचे म्हटले आहे. तसेच ओमिक्रॉन व्हेरिएंटमध्ये अधिक म्यूटेशन आढळून येत आहेत. त्यामुळे आरोग्य संघटनेने ओमिक्रॉन व्हेरिएंटला व्हेरिएंट ऑफ कंसर्न यादीत समाविष्ट केले. ओमिक्रॉन व्हेरिएंटची वाढती प्रकरणे पाहता आरोग्य तज्ज्ञांकडूनही चिंता व्यक्त होतेय. दरम्यान ब्रिटनमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून आत्ता नागरिकांसाठी नवे नियम लागू करण्यात आले आहेत.

ब्रिटनमध्ये ओमिक्रॉनचा कहर पाहता सरकारने वर्क फ्रॉम होम, मास्क आणि सार्वजनिक प्रवासासाठी वॅक्सीन पास बंधनकारक केला आहे. ब्रिटन सरकारचा ओमिक्रॉन व्हेरिएंटविरोधात लढण्यासाठीचा हा बी प्लॅन आहे. यात रुग्णसंख्या वाढू नये यासाठी देखील कठोर उपाययोजना केल्या आहेत.

- Advertisement -

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ब्रिटन नागरिकांना शक्यतो घरातून काम करण्याचे आवाहन केले आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी फेस मास्क, कुठल्याही ठिकाणी जाण्यासाठी लसीकरण प्रमाणपत्र बंधनकारक असल्याच्या सुचना केल्या आहेत. ओमिक्रॉन विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठई ब्रिटन सरकारकडून कडक पाऊले उचलली जात आहेत.

ब्रिटनमध्ये बूस्टर डोस देण्यास सुरुवात

बोरिस जॉन्सन यांच्या माहितीनुसार, ओमिक्रॉन व्हेरिएंट वेगाने पसरत असल्याने सरकारने बी प्लॅन लागू केला आहे. तसेच देशात बूस्टर डोसला परवानगी देण्यात आली आहे. मात्र ब्रिटनमध्ये आत्ता लागू केलेले निर्बंध हे याआधीच्या लॉकडाऊनपेक्षा वेगळे आहेत. शहरातील मध्यवर्ती रेस्टॉरंट्स कॅफे आणि दुकानदारांना ख्रिसमसच्या काळात चांगले पैसे कमावण्याच्या आशेवर होते. मात्र ओमिक्रॉनमुळे जॉन्सन सरकराने लादलेल्या नव्या नियमामुळे विरोधी पक्षांनी नाराजी व्यक्त केली. मात्र या नव्या निर्बंधांमुळे ब्रिटनची आर्थिक स्थिती पुन्हा ढासळण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

ब्रिटनमध्ये ओमिक्रॉनचे ५६८ रुग्ण

ब्रिटनमध्ये सध्या ओमिक्रॉनचे ५६८ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे ब्रिटनमध्ये नाईट क्बल आणि गर्दीच्या ठिकाणी एनएचएस कोरोना पास अनिवार्य केला आहे. तसेच शक्य झाल्यास घरुनच काम करा असा सुचना दिल्या आहेत.


Delhi-Jaipur highway Reopen : अखेर एक वर्षांनंतर दिल्ली-जयपूर हायवे होणार सुरु, आंदोलक शेतकरी या म्हणाले?


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -