घरक्रीडाAshes 1st test : Aus vs Eng ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडविरोधात मोठा विजय, ICC...

Ashes 1st test : Aus vs Eng ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडविरोधात मोठा विजय, ICC ची दंडात्मक कारवाई

Subscribe

एशेज टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियन संघाने विशेषतः गोलंदाजांनी केलेल्या चमकदार कामगिरीमुळे इंग्लंडविरोधात ९ विकेट्सने विजय मिळवला. पहिल्यांच इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी ५० षटकातच १४७ धावावंर इंग्लंडच्या संघाला रोखले होते. या इनिंगमध्ये पॅट कमिन्सने पाच विकेट्स घेतले. गाबा येथे सुरू असलेल्या अॅशेजच्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून ९ विकेट्सने पराभूत झाल्यानंतर इंग्लंडच्या संघाला आणखी एक दणका बसला आहे. इंग्लंडला धीम्या ओव्हर रेटसाठी १०० टक्के मॅच फी आणि आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीप (WTC) च्या पाच अंकांचा दंड आकारण्यात आला आहे. (Ashes Series Aus vs Eng aus win over eng by 9 wickets icc penalty on England for slow overrate)

या सामन्यात ऑस्ट्रेलियन ट्रॅविस हेडने इंग्लंडविरोधात चांगली १५२ धावांची खेली करत संघाला सामन्यात चांगली पकड मिळवून दिली. दुसरीकडे डेविड वॉर्नरच्या ९४ धावांच्या खेळीने ४२५ धावांचा डोंगर ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या इनिंगमध्ये उभारला. दुसऱ्या इनिंगमध्येही इंग्लंडला २९७ धावांपर्यंतच मजल मारता आली. या इनिंगमध्ये डेविड मालन (८२) आणि जो रूट (८९)ने चांगली फलंदाजी केली. पण त्यानंतर कोणत्याही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाच्या दमदार गोलंदाजीविरोधात इंग्लंडचा संघ २९७ धावांवर ऑल आऊट झाला. अवघ्या २० धावांचे लक्ष्य हे ऑस्ट्रेलियाला देण्यात आले. हे टार्गेट ऑस्ट्रेलियाने १ विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले.

- Advertisement -

गाबा येथे सुरू असलेल्या अॅशेजच्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून ९ विकेट्सने पराभूत झाल्यानंतर इंग्लंडच्या संघाला आणखी एक दणका बसला आहे. इंग्लंडला धीम्या ओव्हर रेटसाठी १०० टक्के मॅच फी आणि आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीप (WTC) च्या पाच अंकांचा दंड आकारण्यात आला आहे. मॅच रेफरी डेविड बून यांनी जो रूटच्या संघाने धीम्या ओव्हर रेटने खेळ केल्यासाटी हा दंड आकारला.

नियोजित वेळेपेक्षा धीम्या गतीने गोलंदाजी केल्यासाठी ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. प्रत्येक धीम्या ओव्हरसाठी २० टक्के इतकी दंड आकारणी करण्यात येते. WTC च्या नियमानुसार पाच अंकांची दंडांची आकारणीही या सामन्यातील स्लो ओव्हररेटमुळे करण्यात आली आहे. इंग्लंडच्या संघाला दुसऱ्यांदा हा फटका बसला आहे. या वर्षी ऑगस्टमध्ये इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर असताना टीमला ४० टक्के दंड आकारण्यात आला होता.

- Advertisement -

Nathan Lyon : ४०० व्या विकेटसाठी नॅथन लायनलची ३२६ दिवस प्रतिक्षा, ठरला सातवा स्पिनर

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -