घरताज्या घडामोडीAmir Khan: आमिर खानने फातिमा सना शेख सोबत केलं लग्न? व्हायरल फोटोमागे...

Amir Khan: आमिर खानने फातिमा सना शेख सोबत केलं लग्न? व्हायरल फोटोमागे ‘हे’ आहे सत्य

Subscribe

सत्यमेव जयतेचा प्रचार करणारा आमिर त्याच्या अनेक विवाह आणि पत्नींवर काही बोलणार आहे का?

बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानने तिसरे लग्न केल्याच्या चर्चांना सध्या सोशल मीडियावर उधाण आलं आहे. आमिरने फातिमा सना शेख सोबत तिसर लग्न केले असे म्हटले जात आहे. त्यांच्या लग्नातील काही फोटो एका युझरने सोशल मीडियावर शेअर केले. दरम्यान असे देखील म्हटले जात आहे की आमिरच्या आगामी लाला सिंह चड्डा या सिनेमाच्या रिलीजनंतर आमिर त्याच्या तिसऱ्या लग्नाची घोषणा करणार आहे. मात्र त्याआधीच फातिमा सना शेख आणि आमिर खानच्या लग्नाची सर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.

- Advertisement -

फेसबुकवर आमिर खान आणि फातिमा यांचा एकत्र फोटो असलेली एक पोस्ट शेअर करण्यात आली. ज्यात असे म्हटले आहे की, ‘फातिमा शेख, ही तिच अभिनेत्री आहे जिने आमिर खानच्या दंगल या सिनेमात त्याच्या मुलीची भूमिका साकारली होती. फातिमाने गीता फोगाट ही व्यक्तिरेखा साकारली होती. आज ती आमिरची तिसरी बेगम बनली आहे. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. पण सत्यमेव जयतेचा प्रचार करणारा आमिर त्याच्या अनेक विवाह आणि पत्नींवर काही बोलणार आहे का?’ असा प्रश्न या पोस्टमधून विचारण्यात आला आणि सोशल मीडियावर आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले.

काय आहे व्हायरल फोटोमागचं सत्य?

काही महिन्यांपूर्वी उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी याचा साखरपुडा पार पडला. आकाश अंबानीच्या साखरपुड्यावेळी आमिर किरण यांचा घटस्फोट झाला नव्हता. दोघांनी एकत्र साखरपुड्याला हजेरी लावली होती. साखरपुड्यादरम्यान आमिर आणि किरण यांनी एकत्र फोटो काढला होता. त्या फोटोसोबत छेडछाड करुन किरणच्या जागी फातिमा सना शेखचा फोटो लावण्यात आला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणारा आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाचा फोटो खोटा आहे.

- Advertisement -

आमिर आणि करण यांनी काही महिन्यांपूर्वी दोघांच्या घटस्फोटाचा निर्णय जाहीर केला. ‘१५ वर्षांच्या संसारात एकमेकांच्या साथीने अनेक अनुभव, आनंद मिळाला. आपने नाते केवळ विश्वास, सन्मान आणि प्रेमावर पुढे गेले. आता आपण आपल्या आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू करू इच्छितो. पती पत्नी म्हणून नाही तर पालक म्हणून आपण कुटुंबासोबत असू’, असे आमिर आणि किरण राव यांनी म्हटले होते.


हेही वाचा – ’83’ Movie: कपिल देव प्रमाणे दिसण्यासाठी रणवीरने केली प्रचंड मेहनत

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -