घरक्राइमपुरस्कार स्वीकारण्याआधीच मुंबईच्या तमाशा कलावंताचा अपघाती मृत्यू

पुरस्कार स्वीकारण्याआधीच मुंबईच्या तमाशा कलावंताचा अपघाती मृत्यू

Subscribe

अहमदनगर येथे राज्यस्तरीय कलाभूषण पुरस्कार स्वीकारण्यासाठी मुंबईहून दुचाकीवरुन जात असताना भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत तमाशा कलावंताचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.२२) रात्री मुंबई- महामार्गावर गौळाणे फाटा, नाशिक येथे घडली. या भीषण अपघातात कलावंताचा मुलगा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालय उपचार सुरु आहेत. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. संदीप खंडू निकम (वय ५०, रा. आयुक्त निवास स्टॉप कॉटर्स, नेरूळ, नवी मुंबई) असे मृत्यू झालेल्या कलावंताचे नाव आहे. तर प्रतीक संदीप निकम (वय 20) असे जखमीचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, संदीप निकम हे नवी मुंबई महापालिकेत शिपाई या पदावर कार्यरत होते. शिवाय, ते नाट्य कलावंतदेखील होते. त्यांना राज्यस्तरीय कलाभूषण पुरस्कार जाहीर झाला होता. ते मुलासमवेत पुरस्कार स्वीकारण्यासाठी दुचाकीवरुन मुंबईहून अहमदनगरला जाण्यासाठी बुधवारी निघाले होते. ते विनाहेल्मटे होते. तर मुलाने हेल्मेट परिधान केले होते. ते नाशिकमधील गौळाणे फाट्याच्या वळणावर आले असता त्यांच्या दुचाकीला भरधाव वाहनाने धडक दिली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. तर मुलगा गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी दोघांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करत संदीप निकम यांना म्त घोषित केले. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक शांताराम शेळके करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -