घरताज्या घडामोडी५०० चौरस फुटापर्यंत मुंबईकरांच्या करमाफीला एवढा उशीर का लागला?, आशिष शेलारांचा राज्य...

५०० चौरस फुटापर्यंत मुंबईकरांच्या करमाफीला एवढा उशीर का लागला?, आशिष शेलारांचा राज्य सरकारला सवाल

Subscribe

निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला मुंबईकर आठवले

शिवसेनेने मुंबईतील ५०० चौरस फुटापर्यंत घरांच्या मालमत्ता कर माफीची जी घोषणा केली आहे. यामध्ये एवढा उशीर का लागला?, असा सवाल भाजप आमदार आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. या मागणीला समर्थन किंबहुना भूमिका आम्हीच घेतली. पण शिवसेनेचं मुंबईकरांवरचं आणि विशेषत: ५०० फुटांच्या घरात राहणाऱ्या मुंबईकरांवरचं प्रेम हे बेगडी आहे. ते पुतणा मावशीचं प्रेम आहे. त्यामुळे त्यांची प्राथमिकता काय आहे, ते स्पष्ट होते, असा टोला आशिष शेलार यांनी राज्य सरकारला लगावला आहे.

निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला मुंबईकर आठवले

भाजप आमदार आशिष शेलार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला मुंबईकर आठवले. ज्यावेळी तुम्ही ५०० फुटांच्या कर माफीची घोषणा केली. तेव्हापासूनची सूट मुंबईकरांना दिली पाहीजे. मागील ४ वर्षांपासूनचे जे पैसे तुम्ही घेतले असतील तर ते मुंबईकरांना परत द्या, अशी आमची पहिली मागणी आहे. दुसरीकडे कोरोनाच्या काळामध्ये मध्यमवर्गीयांना सुद्धा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे ५०० फुटापर्यंतचा शून्य कर हे धोरण मध्यवर्गीयांना सुद्धा लागू करा. ५०० फुटापर्यंतचा कर शून्य तर ५०० च्या वर असलेल्या करामध्ये १५० ते २०० रूपये कर असल्यास मुंबईकर भरण्यास तयार होतील. मध्यम वर्गीयांवर अन्याय करू नका.

- Advertisement -

मुंबईकरांचे मागील चार वर्षांचे ५०० फुटांचे पैसे परत करा

बिल्डर्संना मोठ्या प्रमाणात मदत करण्यासाठी ११ हजार कोटी रूपये तुमच्याकडे आहेत. तर मुंबईतले छोटे दुकानदार आणि व्यापाऱ्यांना सुद्धा सुट का नाही दिली. तुम्ही हे केवळ धुळफेक करण्याचं काम करत आहात. जर तुम्हाला सर्वसामान्य मुंबईकरांना खरचं मदत करायची असेल तर तुम्ही त्यांचे मागील चार वर्षांचे ५०० फुटांचे पैसे परत करा, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे.

- Advertisement -

सरकारी तिजोरीत खडखडात असताना सुद्धा सर्वात प्रथम शिवसेनेने ५०० फुटांच्या घरांच्या कर माफीचा विषय केला का तर नाही. त्यांनी मोठ-मोठ्या बिल्डर्संना प्रकल्पात प्रिमियममध्ये सूट मिळावी. यासाठी बिल्डर्स प्रेमींना ११ हजार कोटींची सूट दिली. त्यावेळी त्यांना सामान्य मुंबईकरांची आठवण नाही झाली.

मुंबईतले पब, बार आणि रेस्टॉरंट यांचे मालक देखील शिवसेनेचे मित्र आहेत. त्यामुळे त्यांच्या लाईसन्समध्ये सूट दिली. विदेशी दारूवर ५० टक्के कर माफ केला होता. त्यावेळी सुद्धा ह्यांना ५०० फुटातले मुंबईकर आठवले नाहीत. ठाकरे सरकारने व्हाईन बनवणाऱ्यांना मोठी खैरात दिली. निवडणुकीत सुपडा साप होईल त्यासाठी त्यांनी कर माफ करण्याची भूमिका धावपळीत घेतली आहे.

१७ कोटी पेंग्विनला आणि मग उरले असतील तर ५०० फुट मुंबईकरांना

बिल्डर्संला ११ हजार कोटी, विदेशी मद्याला मदत, पब, डिस्को आणि बार वाल्यांना त्यांनी मदत केली. त्यानंतर त्यामध्येही काही मुंबई महापालिकेकडे पैस उरले असतील. तर पहिले १७ कोटी पेंग्विनला आणि मग उरले असतील तर ५०० फुट मुंबईकरांना अशी शिवसेनेची प्राथमिकता आहे, असं शेलार म्हणाले.

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना खास भेट दिली आहे. मुंबईतील ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या नगरविकास खात्याच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. काल नगरविकास खात्याची महत्त्वाची बैठक पार पडली. यामध्ये व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली.त्यावर आता भाजपकडून टीका होताना दिसत आहे.


हेही वाचा : Harbhajan Singh: माझ्या कारकिर्दीत अनेक व्हिलन, धोनीनंतर BCCI वर भज्जीचा निशाणा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -