घरमहाराष्ट्रमाजी सैनिकांनी दिला मुलगी वाचवा मुलगी शिकवाचा संदेश

माजी सैनिकांनी दिला मुलगी वाचवा मुलगी शिकवाचा संदेश

Subscribe

अहमनगर येथील जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने एका माजी सैनिकांने मुलगी वाचवा मुलगी शिकवाचा संदेश दिला आहे.

अहमनगर येथील जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने तपोवन रोड येथील अंगणवाडीत माजी सैनिकांनी स्त्री जन्माचे स्वागत करुन मुलगी वाचवा, मुलगी शिकवा असा संदेश दिला आहे. तर महिला सक्षमीकरण उपक्रमातंर्गत मुली आणि महिलांसाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांकडून माहिती देखील देण्यात आली आहे.

स्त्री भ्रूणहत्येवर सादर केले नाटक

अंगणवाडी सेविकाकांनी स्त्री भ्रूणहत्येवर नाटक सादर करत समाजातील वास्तवता लोकांना दाखवली आहे. भाऊसाहेब कर्पे यांनी फाऊंडेशनच्या माध्यमातून माजी सैनिकांनी राबविलेल्या विविध सामाजिक उपक्रमाची माहिती दिली. तसेच संजय पाटेकर यांनी मुली आणि महिलांसाठी असलेल्या योजनांची माहिती देऊन, उपस्थितांना मुलगी वाचवा आणि मुलगी शिकवाची शपथ देखील दिली आहे.

- Advertisement -

सीमेवर रक्षण करणार्‍या सैनिकांचे ऋण न फेडता येणारे आहे. त्यांच्या देशसेवेने सर्व नागरिक आनंदात राहतात. तर माजी सैनिकांनी देखील सामाजिक उत्तर दायित्व या भावनेने राबविलेले सामाजिक उपक्रम कौतुकास्पद असल्याची भावना सविता कर्डिले त्यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -