घरताज्या घडामोडीKiran Mane: अभिनेते किरण मानेंना मालिकेतून काढल्याने 'मुलगी झाली हो' चे...

Kiran Mane: अभिनेते किरण मानेंना मालिकेतून काढल्याने ‘मुलगी झाली हो’ चे चित्रीकरण स्थानिकांनी बंद पाडले

Subscribe

किरण मानेंवर स्टार प्रवाह वाहिनीने अन्याय केला असून त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली नाही. किरण माने यांची बाजू न ऐकून घेता त्यांना मालिकेतून काढून टाकण्यात आले असे त्यांच्या चाहत्यांचे म्हणणे असून घडल्याप्रकाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी वाईतील स्थानिकांनी मालिकेचे शुटींग बंद पाडले

अभिनेते किरण माने (Kiran Mane) )  यांना मालिकेतून काढून टाकल्यानंतर निर्माण झालेला वाद हा थांबण्याचे नाव घेत नाहीये. किरण मानेंना मालिकेतून बाहेर काढल्याने मुलगी झाली हो या मालिकेचे शुटींग स्थानिकांकडून बंद पाडण्यात आले आहे. (Mulgi Jhali Ho shooting was stopped ) साताऱ्याच्या वाई येथे मालिकेचे शुटींग सुरू होते. किरण माने राजकीय पोस्ट लिहितात म्हणून किरण मानेंना मालिकेतून काढून टाकण्यात आले असा आरोप किरण माने यांच्याकडून करण्यात आला होता. किरण मानेंना मालिकेतून काढून टाकल्याचा निषेध व्यक्त करत माने यांच्या चाहत्यांनी वाईत सुरू असलेले मुलगी झाली हो या मालिकेचे चित्रकरण थांबवले आहे. टीव्ही 9 मराठीने याबाबत वृत्त दिले.

किरण माने यांच्यासोबत झालेल्या प्रकारानंतर महाराष्ट्रातील प्रेक्षकांकडून त्यांना सपोर्ट मिळाल्याचे दृश्य वाईत पहायला मिळाले आहे. किरण मानेंवर स्टार प्रवाह वाहिनीने अन्याय केला असून त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली नाही. किरण माने यांची बाजू न ऐकून घेता त्यांना मालिकेतून काढून टाकण्यात आले असे त्यांच्या चाहत्यांचे म्हणणे असून घडल्याप्रकाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी वाईतील स्थानिकांनी मालिकेचे शुटींग बंद पाडले, अशी माहिती देण्यात येत आहे.

- Advertisement -

किरण मानेंनी घेतली शरद पवारांकडे धाव 

मागील २ दिवसांपासून हे प्रकरण गाजत आहे. काही व्यावसायिक कारणांमुळे किरण मानेंना मालिकेतून काढले असल्याचे स्पष्टीकरण निर्मांत्यांकडून देण्यात आले. मात्र किरण माने यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची शनिवारी भेट घेऊन त्यांनी झाल्या प्रकाराची माहिती देत त्यांच्यासमोर काही पुरावे सादर केले आहेत. जवळपास दीड तास माने पवार यांच्यात बातचीत झाली. आणि आता दुसरीकडे वाईतील स्थानिकांनी मालिकेचे चित्रीकरण बंद पाडले आहे त्यामुळे हा वाद काही कमी होईल असे वाटत नाही.

‘सांकृतिक क्षेत्राची माहिती असलेले, सांस्कृति क्षेत्राची जाण असणारे शरद पवार हे एकमेव नेते आहेत. बुद्धिमान विचारी आणि संयमी नेते आहेत. तटस्थपणे ते सगळं ऐकून घेतात. मी माझी मी माझी बाजू त्यांना सांगितली. मला मालिकेतून बाहेर काढणे ही एक प्रकारे झुंडशाही वाटते. मी माझे हे सगळे मुद्दे शरद पवार यांच्याकडे मांडले असून  मला आशा आहे यावर ते नक्की तोडगा काढतील पवार असे किरण माने यांनी म्हटले. Kiran Mane: अभिनेते किरण मानेंनी घेतली शरद पवारांची भेट, दीड तास केली चर्चा

- Advertisement -

हेही वाचा – अभिनेते किरण मानेंवरील कारवाई व्यावसायिक कारणांमुळे, पॅनोरामा एंटरटेनमेंटचे स्पष्टीकरण

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -