घरताज्या घडामोडीमुंबईच्या सौंदर्यात पडली भर; पदपथ आणि उद्यानातील कांचन वृक्ष फुलला

मुंबईच्या सौंदर्यात पडली भर; पदपथ आणि उद्यानातील कांचन वृक्ष फुलला

Subscribe

मुंबई महापालिकेतर्फे मुंबईला प्रदूषणमुक्त, स्वच्छ व सुंदर शहर बनविण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच, मुंबईला हरित मुंबई बनविण्याचा विडा पालिका उद्यान खात्याने उचलला आहे. याच अनुषंगाने मुंबईतील पदपथ, उद्याने या ठिकाणी पालिकेतर्फे काही कालावधीपूर्वी लावण्यात आलेले कांचन वृक्ष आता चांगलेच फुलले आहेत. त्यामुळे मुंबईच्या सौंदर्यात आणखीन भर पडली आहे.

मुंबई महापालिकेच्या उद्यान खात्यातर्फे शहर आणि उपनगरात ठिकठिकाणच्या उद्याने आणि पदपथ या ठिकाणी काही वृक्ष लावण्यात आले आहेत. त्यामध्ये कांचन वृक्षाचाही समावेश होता. हे वृक्ष दरवर्षी फेब्रुवारी ते मार्च अखेरपर्यंत फुलतात. हे वृक्ष पर्यटक आणि नागरिकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतात. या वृक्षावरील लाल, गुलाबी फुलांमुळे सदर परिसराच्या सौंदर्यकरणात भर पडली आहे.

- Advertisement -

दादर पारशी कॉलनी, वामनराव महाडिक उद्यान परळ, प्रमोद महाजन कला पार्क दादर, कात्रक उद्यान बांद्रा (पश्चिम), गिरीपुष्य उद्यान गोरेगाव (पूर्व), आई एकवीरा देवी उद्यान गोरेगाव (पश्चिम), मनोरंजन मैदान पेस्टम नगर चेंबूर या ठिकाणच्या पदपथ आणि उद्यानात कांचन वृक्ष फुलांनी बहरला आहे. सुवासिक, गुलाबी व लाल,जांभळ्या रंगाच्या छटा सुंदर मिश्रणाची असून यावेळी हा वृक्ष फार शोभिवंत दिसतो. विशेष म्हणजे कांचन वृक्ष हे मुळ परदेशी असून आता मुंबईत ही ठिकठिकाणी अन्य शोभिवंत झाडांसह कांचन वृक्षाची दरवर्षी पावसाळ्यात लागवड करण्यात येते, असे पालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले.


हेही वाचा – जागतिक स्वच्छता दिनी सफाई कामगारांचा होणार गौरव, पालिकेचा धोरणात्मक निर्णय

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -