घरक्राइमMoney Laundering Case: इक्बाल कासकरला सात दिवसांची ईडी कोठडी, PMLA कोर्टाचा निर्णय

Money Laundering Case: इक्बाल कासकरला सात दिवसांची ईडी कोठडी, PMLA कोर्टाचा निर्णय

Subscribe

दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला पीएमलए कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने इक्बाल कासकरला सात दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. ईडीने दाऊद आणि त्याच्या साथीदारांविरोधातील मनी लॉंन्ड्रिंगच्या प्रकरणात इक्बाल कासकरला अटक केली आहे. इक्बाल कासकर कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा भाऊ आहे. ईडीने इक्बाल कासकरची 7 दिवसांसाठी ईडी कोठडी मागितली होती. ज्याला कोर्टाने मान्यता दिली आहे, त्यामुळे कासकरला सात दिवस ईडीच्या कोठडीत राहावे लागणार आहे.

ईडीने इक्बाल कासकरची चौकशी करण्याची परवानगी देण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. मंगळवारी छोटा शकीलचा साथीदार सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रूट याची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशी करण्यात आली. ईडीकडून चौकशी सुरु असलेल्या या प्रकरणाचा संबंध थेट राष्ट्रीय तपास संस्था (NIA) प्रकरणाशी आहे ज्यात दहशत पसरवण्याचा आणि धार्मिक सलोखा बिघडवण्याच्या योजना आखल्याबद्दल गेल्या आठवड्यात दाऊद इब्राहिम डी-कंपनीविरुद्ध बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायदा (UAPA) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला होता. ईडीच्या सुमारे 70 अधिकाऱ्यांनी दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी त्याचा भाऊ इक्बाल कासकर, छोटा शकीलचा मेहुणा सलीम फ्रूट आणि इब्राहिमची बहीण हसिना पारकर यांच्या घरासह 10 परिसरांतील मालमत्तेची झाडाझडती घेतली.

- Advertisement -

हे सर्व संशयित आरोपी खंडणी, अंमली पदार्थांची तस्करी, मुंबईतील विविध भागात स्थावर मालमत्तेची विक्री आणि इतर बेकायदेशीर कामांद्वारे बेकायदेशीरपणे पैसे जमा करत असल्याचा ईडीला संशय आहे. तसेच मिळालेला पैसा ते दहशतवादी कारवाया किंवा देशविरोधी कारवायांसाठी वापर असल्याचाही ईडीला संशय आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अँटी मनी लॉन्ड्रिंग एजन्सीने मुंबई आणि दुबईमध्ये कार्यरत असलेल्या भारतीय व्यावसायिकांशी संबंधित या कथित बेकायदेशीर मालमत्ता सौद्यांशी संबंधित कागदपत्रे जप्त केली आहेत.

या संशयास्पद सौद्यांचे काही राजकीय दुवे देखील एजन्सीच्या छाननीखाली आहेत. कासकरला ठाणे पोलिसांनी 2017 मध्ये खंडणीच्या एका प्रकरणात अटक केली होती. ठाणे पोलिसांनी इक्बाल कासकर आणि अनीस इब्राहिम आणि इतरांविरुद्ध वसुलीचा गुन्हा दाखल केला होता, त्यांची कागदपत्रे ईडीने ताब्यात घेतली आहेत.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -