घरअर्थजगतCar Price in India: कार खरेदी करणं महागणार, 1 एप्रिलपासून किमती वाढणार

Car Price in India: कार खरेदी करणं महागणार, 1 एप्रिलपासून किमती वाढणार

Subscribe

कार निर्माता कंपनी टोयोटा किर्लोस्कर मोटर, टाटा मोटर्स, बीएमडब्ल्यू इंडिया आणि मर्सिडिज बेंजसह अनेक कंपन्यांनी आपल्या वाहनांच्या किमती वाढवणार असल्याची माहिती दिलीय. कार उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालासह इतर पार्ट्स महागलेत.

नवी दिल्लीः Car Price in India: जर तुम्ही नवी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर लागलीच ते करून टाका, कारण लवकरच वाहनांच्या किमती वाढणार आहेत. अनेक कार निर्माता कंपन्यांनी 1 एप्रिलपासून वाहनांच्या किमती वाढवणार असल्याचं सांगितलंय. स्टील, अॅल्युमिनियम आणि इतर पार्ट्सच्या किमती वाढल्यामुळे त्याचा परिमाण कार उत्पादकांवर झालाय.

कार निर्माता कंपनी टोयोटा किर्लोस्कर मोटर, टाटा मोटर्स, बीएमडब्ल्यू इंडिया आणि मर्सिडिज बेंजसह अनेक कंपन्यांनी आपल्या वाहनांच्या किमती वाढवणार असल्याची माहिती दिलीय. कार उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालासह इतर पार्ट्स महागलेत. जपानची कार निर्माता कंपनी टोयोटा किर्लोस्कर मोटर आपल्या गाड्यांच्या किमती वाढवण्याच्या तयारीत आहे. कंपनीनं 1 एप्रिलपासून टोयोटोच्या सर्व मॉडेलच्या किमतींवर 4 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केलीय. टोयोटोचे पार्ट्स महागल्यानं किमती वाढणार असल्याचं कारण दिलं जात आहे. टोयोटा किर्लोस्कर भारतात ग्लेंजाशिवाय फॉर्च्युनर, इनोव्हा क्रिस्टा, कॅमरी, वेलफायर, अर्बन क्रूझरसह 6 मॉडेल विकते.

- Advertisement -

BMW India नेही आपल्या गाड्यांच्या किमती वाढवणार असल्याचं सांगितलंय. कंपनीने एक एप्रिलपासून गाड्यांच्या किमती 3.5 टक्क्यांनी वाढवल्यात. मटेरियल आणि लॉजिस्टिक्स कॉस्टमध्ये वाढ झाल्यानं कंपनीनं गाड्यांच्या किमती वाढवल्यात.

3 टक्क्यांनी महागणार Mercedes Benz

मर्सिडिज बेंज इंडियाने सर्व मॉडेलच्या किमतीत 1 एप्रिलपासून 3 टक्क्यांची वाढ केलीय. 1 एप्रिलनंतर कंपनीनं गाड्यांच्या किमती 50 हजार रुपयांपासून 5 लाख रुपयांपर्यंत वाढवल्यात. टाटा मोटर्सने आपल्या गाड्यांच्या किमती 2 ते 2.5 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतलाय. टाटा ग्रुपची कार निर्माता कंपनी टाटा मोटर्स आपल्या वाहनांच्या किमतीत 1 एप्रिलपासून वाढ करणार आहे. कमर्शिअल व्हेईकल (CV) मध्ये 2-2.5 वाढ होणार आहे.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -