घरमनोरंजनKim Sharma ने Leander Peas सोबतच्या प्रेमाची दिली जाहीर कबुली; First Anniversary...

Kim Sharma ने Leander Peas सोबतच्या प्रेमाची दिली जाहीर कबुली; First Anniversary फोटो केले शेअर

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री किम शर्मा इंडस्ट्रीपासून काहीशी दूर असली तरी वैयक्तिक आयुष्यामुळे ती नेहमी चर्चेत असते. अलीकडेच अभिनेता हर्षवर्धन राणेसोबतच्या रिलेशनशीपमुळे किम शर्मा चर्चेचा विषय ठरली होती, पण आता तिच्या आयुष्यात एका टेनिसपटूची एन्ट्री झाली आहे. किम शर्मा आता टेनिसपटू लिएंडर पेससोबत रिलेशनशीपमध्ये आहे. त्यांचे हे रिलेशेनशीप कोणापासून लपून राहिले नाही. दरम्यान दोघांच्या नात्याबद्दल बरीच चर्चा झाली. वर्षभरापूर्वी किमने स्वत: तिच्या अकाऊंटवर लिएंडर पेससोबतचे काही फोटो शेअर केले होते. गोव्यातील दोघांचे हे रोमॅन्टिक फोटो खूप व्हायरल देखील झाले. तेव्हापासूनचं किम शर्मा आणि लिएँडर पेस यांच्यातील नात्याबद्दल बोलले जाऊ लागले. आज या दोघांच्या नात्याला एक वर्ष पूर्ण झालं. या निर्मित्ताने किमने तिच्या इन्स्टाग्रामवर लिएंडर पेससोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत. ज्यात दोघांचे कधीही न पाहिलेले रोमँटिक क्षण पाहता येत आहेत. या कपलने फर्स्ट अॅनिव्हसरीनिमित्ताने एक स्पेशल सेलिब्रेशन देखील केले. या सेलिब्रेशनचे फोटो कपलने आपल्या अकाऊंटवर शेअर केले.

किमने लिएंडरला फर्स्ट अॅनिव्हर्सरीच्या शुभेच्या देत दोघांचे अगदी रोमँटिक फोटो शेअर केलेत. किम शर्माने या फोटोंखाली एक सुंदर कॅप्शनही लिहिलं आहे. हॅप्पी अॅनिव्हर्सरी चार्ल्स, 365 असं किमने कॅप्शनमध्ये लिहिले आहे. तर हॅप्पी अॅनिव्हर्सरी मिच… तू मला पहिल्याच नजरेत आवडली होतीस… असं लिएंडरने लिहिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Leander Paes (@leanderpaes)

- Advertisement -

किम आणि लिएंडर यांनी वर्षभरापूर्वी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. दोघं गोव्यात एकमेकांसोबत एन्जॉय करताना दिसले. तेव्हापासून दोघांच्या नात्याची चर्चा रंगली. यानंतर दोघांनी महिन्याभरानंतर रिलेशनशिप कन्फर्म केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kimi Sharma (@kimsharmaofficial)

- Advertisement -

किम शर्मा यापूर्वी अभिनेता हर्षवर्धन राणेसोबत रिलेशनशिपमध्ये होती. किम आणि हर्षवर्धनच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. तर क्रिकेटपटू युवराज सिंहसोबतही तिचे रिलेशनशीप सुरु असल्याचा चर्चा झाल्या. दोघांनी चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले. यानंतर किम भारत सोडून परदेशात गेली. तेथे केनियातील एका उद्योजकासोबत तिने संसार थाटला पण तिचे हे लग्न देखील फार काळ टिकले नाही. ती दोन वर्षातचं वेगळी झाली. तर लिएंडर पेस यापूर्वी संजय दत्तची एक्स वाईफ आणि मॉडेल रिया पिल्लईसोबत लिव्ह इन रिलेशपमध्ये होता. दोघांना एक मुलगी देखील आहे.


हेही वाचा : विल स्मिथने कानशिलात लगावल्याच्या प्रकरणावर बॉलिवूडचा भाईजान म्हणाला…

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -