घरताज्या घडामोडीST Workers Strike : पवारांच्या घरावरील हल्ला हे राजकीय षडयंत्र - खासदार...

ST Workers Strike : पवारांच्या घरावरील हल्ला हे राजकीय षडयंत्र – खासदार संजय राऊत

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी काल एसटी कर्मचाऱ्यांनी तीव्र आंदोलन केले. यावेळी काही आंदोलकांनी पवारांच्या निवासस्थानाच्या दिशेने चप्पल आणि दगड भिरकवल्याचेही पाहायला मिळाले. दरम्यान, शरद पवारांच्या घरावरील हल्ला हे राजकीय षडयंत्र असू शकतं, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले.

पवारांच्या घरावरील हल्ला हे राजकीय षडयंत्र

संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा राऊत म्हणाले की, जर ते स्वत:ला एसटी कर्मचारी समजत असतील, तर मी समजतो की हे आंदोलन नव्हतं. हे शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याचं षडयंत्र असू शकतं. हा कट रचण्यामागे नक्की सूत्रधार कोण आहे. त्याबाबतची माहिती लवकरच समोर येईल. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत शरद पवारांचा काहीही संबंध नाहीये, असं संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

काटकारस्थान रचण्याचा प्रयत्न

राज्य सरकारने नेत्यांशी चर्चा केलेली आहे. तसेच न्यायालयाने सुद्धा दिशा दिली आहे. त्यांच्या सर्व मागण्या राज्य सरकारने जवळपास पूर्ण केल्या आहेत. तरी सुद्धा राजकीय आणि सामाजिक परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न कोणीतरी करत आहे. कोणतरी काटकारस्थान रचण्याचा प्रयत्न करत आहे, असं राऊत म्हणाले.

राज्यातील राजकीय वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न

शरद पवार हे महाराष्ट्राचेच नाही तर देशातील प्रमुख नेते आहेत. त्यांच्या घरावर जाऊन अशा प्रकारचं वर्तन करणं ही आपली संस्कृती नाहीये. राज्यातील राजकीय वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तुम्ही पण काचेच्या घरात राहताय, लक्षात ठेवा. आपण ज्या माणसांचं पालन-पोषण करत आहात. ते राक्षस तुम्हालाही खाऊन टाकतील, असं राऊत म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : ST Workers Strike : आधी जल्लोष, मग नंतर आंदोलन का? आंदोलकांना कुणीतरी भडकवतयं- अजित पवार


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -