घरताज्या घडामोडीgunratna sadavarte : गुणरत्न सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, सदावर्तेंचा जामिनासाठीचा मार्ग...

gunratna sadavarte : गुणरत्न सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, सदावर्तेंचा जामिनासाठीचा मार्ग मोकळा

Subscribe

एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. गुणरत्न सदावर्ते यांना १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे सदावर्तेंना सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणीदरम्यान पोलिसांनी पोलीस कोठडी मागितली होती परंतु कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी दिली आहे. सदावर्ते आता जामीनासाठी अर्ज करु शकतात. त्यांचा जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावर एसटी कर्मचाऱ्यांच्या संतप्त गटाने हल्ला केला. या हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार वकील गुणरत्न सदावर्ते असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत. सदावर्ते यांना सत्र न्यायालयाने पहिले दोन दिवस आणि नंतर पुन्हा दोन दिवस पोलीस कोठडी सुनाणीदरम्यान सुनावली होती. त्यांची १३ एप्रिलपर्यंतची पोलीस कोठडी संपली होती. त्यांना पुन्हा कोर्टात हजर केल्यानंतर सरकारी वकिलांनी पोलीस कोठडीत वाढ करुन देण्याची मागणी केली. सदावर्तेंच्या वकिलांनी या मागणीला विरोध केला.

- Advertisement -

गुणरत्न सदावर्ते यांना वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद करुन त्यांच्या अडचणी वाढवण्यात येत असल्याचा युक्तिवाद सदावर्तेंच्या वकिलांनी केला आहे. तर सरकारी वकिल प्रदीप घरत यांनी सदावर्तेंची पोलीस कोठडी वाढवून देण्यात यावी अशी मागणी केली. सदावर्ते यांच्याविरोधात पोलिसांना पुरावे मिळाले आहेत. आरोपींची आणि सदावर्ते यांची समोरा समोर बसवून चौकशी करायची आहे. असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला आहे.

सदावर्तेकडून मृण्मयी कुलकर्णी यांनी गिरगाव कोर्टातील ४० नंबरच्या न्यायालयात युक्तिवाद केला. न्यायाधीश नदीम मेमन यांच्यापुढे ही सुनावणी झाली आहे. सरकारी पक्षाने आपल्या वतीने पूर्ण प्रयत्न केला की, सदावर्ते यांची पोलीस कोठडी वाढवून मिळावी परंतु न्यायालयाने नकार देत सदावर्तेंना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -

सदावर्तेंचा तपास पूर्ण झाला

सदावर्ते यांच्याकडून वकील कुलकर्णी यांनी युक्तिवाद केला. यावेळी त्यांनी म्हटंल आहे की, शरद पवार यांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी सदावर्ते यांना अटक करण्यात आली आहे. या संदर्भात त्यांचा तपास पूर्ण झाला आहे. परंतु राज्य सरकार आणि मुंबई पोलीस सदावर्ते यांच्यावर नवीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदावर्ते यांच्या अडचणी वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे सदवर्ते यांना पोलीस कोठडी देऊ नये असा युक्तिवाद सदावर्तेंच्या वकिलांनी केला आहे.


हेही वाचा : Nawab Malik : नवाब मलिक यांच्या ८ मालमत्ता ED मार्फत जप्त

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -