घरताज्या घडामोडी८० वर्षीय फायर आजीच्या भेटीला ठाकरे कुटुंबीय, मुख्यमंत्री म्हणाले हे तर बाळासाहेबांनी...

८० वर्षीय फायर आजीच्या भेटीला ठाकरे कुटुंबीय, मुख्यमंत्री म्हणाले हे तर बाळासाहेबांनी…

Subscribe

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचाविरोधात मातोश्री बाहेर पहारा देणाऱ्या आजींच्या घरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब भेट घेतली आहे. या आजींचं नाव चंद्रभागा गणपत शिंदे असून त्या मुंबईतील परळ या ठिकाणी राहतात. ८० वर्षीय फायर आजींच्या घरी भेट घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे गेले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आजींसोबत काही वेळ गप्पा मारल्या. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

झुकनेवाले शिवसैनिक नाहीयेत…

शिवसेनाप्रमुख नेहमी म्हणायचे की, व्यक्ती वयाने मोठी असली तरी मनाने तरुण असली पाहीजे. तशी ही आमची आजी असली तरी अजूनही त्या मनाने युवासेनेच्या कार्यकर्त्या आहेत. शिवसैनिकांनी मला दिलेला सर्वात मोठा आशीर्वाद आहे. त्यामुळे मी माझ्या कर्तव्यांनुसार नतमस्तक व्हायला आलो. झुकेगा नही… हे बाळासाहेबांनी शिवसैनिक जे तयार केलेत. ते झुकनेवाले शिवसैनिक नाहीयेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

वर्षा निवासस्थानी येण्याचं आमंत्रण

एवढ्या वर्ष साहेबांसोबत वावरल्यामुळे मला पोचपावती मिळाली आहे. तसेच सर्व ठाकरे कुटुंबीय भेटण्यासाठी आल्यामुळे मला खूप आनंद झाला. काळजी घेण्यासाठी मला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, अशी प्रतिक्रिया आजींनी दिली आहे. तसंच वर्षा निवासस्थानी येण्याचं आमंत्रण सुद्धा मुख्यमंत्र्यांनी आजींना दिलं आहे.

आजी चर्चेत कशा आल्या?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर जाऊन हनुमान चालिसा पठण करण्यावरुन राज्यात शिवसेना विरुद्ध राणा असा संघर्ष पेटला. यावेळी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर जाऊन हनुमान चालिसेचं पठण करणार असं आव्हान दिलं होतं. त्यानंतर हे राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झाल्यानंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक होताना पहायला मिळाले. परंतु या सगळ्या गदारोळात एक आजीबाई चांगल्याच चर्चेत आल्या. या आजीबाई शिवसैनिकांसोबत राणा दाम्पत्याच्या घराबाहेरील आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

- Advertisement -

चंद्रभागा गणपत शिंदे असं या आजीचं नाव आहे. राज्यात तणावाचं वातावरण सुरू असताना या आजीबाई आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. झुकेगा नही साला, असा पुष्पा या चित्रपटातला डायलॉग त्यांनी मारला. त्यानंतर या आजीबाईंना पाहून शिवसेना कार्यकर्त्यांनीही रवी राणा कायर आहे, आजी आमची फायर आहे, अशा घोषणा दिल्या. तू मातोश्रीवर येऊन दाखवच, असा थेट इशारा या आजीबाईंनी राणांना दिला होता.

या चंद्रभागा आजीबाईंची बातमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचली. यानंतर त्यांनी तातडीने फोनवरून त्या आजींशी संपर्क साधला. उद्धव ठाकरेंनी आजींना मातोश्रीवर बोलावून घेतलं. तसेच त्यांची ख्यालीखुशाली विचारली. मात्र, आज मुख्यमंत्र्यांनी फायर आजींच्या घरी येऊन त्यांची पुन्हा एकदा भेट घेतली असून त्यांना वर्षा निवासस्थानी येण्याचं आमंत्रण देण्यात आलं आहे.


हेही वाचा : हनुमान चालिसेला महाराष्ट्रात विरोध नाही, कारागृहात बसूनही वाचू शकता; संजय राऊतांचा राणांना टोला


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -