घरक्रीडाIPL 2022 : मुंबई इंडियन्सच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद

IPL 2022 : मुंबई इंडियन्सच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद

Subscribe

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 15 व्या पर्वात मुंबई इंडियन्सची निराशाजनक कामगिरी सुरूच आहे. सोमवारी डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने 52 धावांनी पराभव केला. मुंबईचा आयपीएलच्या चालू मोसमातील हा नववा पराभव आहे.

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 15 व्या पर्वात मुंबई इंडियन्सची निराशाजनक कामगिरी सुरूच आहे. सोमवारी डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने 52 धावांनी पराभव केला. मुंबईचा आयपीएलच्या चालू मोसमातील हा नववा पराभव आहे. कोलकात्याविरुद्धच्या पराभवासह रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे.

मुंबईचा संघ यंदा आयपीएलच्या गुणतालिकेत तळाशी आहे. याआधी मुंबईने 5 वेळा आयपीएलचे जेतेपद पटकवले. परंतु, मुंबई इंडियन्सचा परमॉर्मन्स इतका वाईट असेल आणि महत्वाचे म्हणजे मुंबईचा संघ गुणतालिकेत तळाशी राहिल असे कुणी विचारही केला नव्हता. मात्र यंदाच्या पर्वात ते प्रत्यक्षात पाहायला मिळतंय.

- Advertisement -

वास्तविक, आयपीएलच्या एकाच मोसमात मुंबईने प्रथमच इतके सामने गमावले आहेत. यापूर्वी २००९, २०१४ आणि २०१८ च्या हंगामात मुंबई इंडियन्सने प्रत्येकी आठ सामने गमावले होते. 2012, 2016 आणि 2021 च्या मोसमात त्यांना 7-7 सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते.

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सने 20 षटकांत 9 बाद 165 धावा केल्या. नितीश राणा आणि व्यंकटेश अय्यर यांनी प्रत्येकी 43 धावांची खेळी खेळली. याशिवाय अजिंक्य रहाणेने 25 आणि रिंकू सिंगने नाबाद 23 धावांचे योगदान दिले. मुंबई इंडियन्सकडून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने 5 तर कुमार कार्तिकेयने दोन खेळाडूंना बाद केले.

- Advertisement -

कोलकाताच्या या 113 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मुंबईचा डाव 17.3 षटकांत 113 धावांत गुंडाळला. यष्टिरक्षक फलंदाज इशान किशनने संघासाठी सर्वाधिक 51 धावांचे योगदान दिले. कोलकाताकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक तीन आणि आंद्रे रसेलने दोन खेळाडूंना बाद केले. विशेष म्हणजे मुंबई इंडियन्सच्या शेवटच्या सहा विकेट 14 धावांतच पडल्या.

कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध मुंबई इंडियन्ससाठी आयपीएलमधील 113 धावा ही दुसरी सर्वात कमी धावसंख्या होती. याआधी 2012 च्या आयपीएलमध्ये वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात कोलकाता विरुद्ध रोहित ब्रिगेड 108 धावांवर बाद झाला होता. आयपीएलच्या इतिहासात केकेआरने मुंबईला सलग 2 सामन्यात पराभूत करण्याची ही दुसरी वेळ आहे.


हेही वाचा – टी-२० वर्ल्ड कपपूर्वी ऑस्ट्रेलियन टीम करणार भारताचा दौरा; वाचा सामने कुठे होणार?

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -