घरक्रीडाIPL 2022 : बरगडीला दुखापत; रवींद्र जडेजा आयपीएलमधून बाहेर

IPL 2022 : बरगडीला दुखापत; रवींद्र जडेजा आयपीएलमधून बाहेर

Subscribe

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) 15 व्या पर्वातील चेन्नई सुपर किंग्ज संघाचा सुरवातीच्या सामन्याचा कर्णधार आणि फिरकीपटू गोलंदाज रविंद्र जडेजा आयपीएलमधून बाहेर गेला आहे. रवींद्र जडेजा हा दुखापत झाल्यामुळे आयपीएलमधून बाहेर पडला आहे.

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) 15 व्या पर्वातील चेन्नई सुपर किंग्ज संघाचा सुरवातीच्या सामन्याचा कर्णधार आणि फिरकीपटू गोलंदाज रविंद्र जडेजा आयपीएलमधून बाहेर गेला आहे. रवींद्र जडेजा हा दुखापत झाल्यामुळे आयपीएलमधून बाहेर पडला आहे. याबाबत चेन्नई सुपर किंग्ज फ्रँचायझीने याची अधिकृत घोषणा केली आहे.

चेन्नई सुपर किंग्जने आपल्या अधिकृत निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र जडेजाच्या बरगडीला दुखापत झाली आहे. रविवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात तो चेन्नई सुपर किंग्जसाठी उपलब्ध नव्हता. तो डॉक्टरांच्या देखरेखीखाली होता. त्यानंतर आता वैद्यकीय सल्ल्याने त्याला आयपीएलच्या उर्वरित सामन्यांसाठी वगळण्यात आले आहे.

- Advertisement -

या पर्वात रवींद्र जडेजाने आठ सामन्यात कर्णधारपद भूषवले, ज्यामध्ये संघाला फक्त दोनच सामने जिंकता आले. रवींद्र जडेजासाठी हे पर्व चांगले गेले नाही. जडेजाकडे चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद एमएस धोनीने आयपीएल २०२२ पूर्वी सोपवले होते. परंतु जडेजाला कर्णधारपद यशस्वी रित्या पार पाडता आलं नाही. जडेजा फलंदाजी आणि गोलंदाजीतही मैदानावरही संघर्ष करताना दिसला. दबावाखाली जडेजाकडूनही झेलही सुटले. यामुळेच त्याने पुन्हा धोनीकडे कर्णधारपद सोपवले.

चेन्नई सुपर किंग्ज आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे. चेन्नई सुपर किंग्ज सध्या आयपीएल २०२२ च्या गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर आहे. चेन्नईने आतापर्यंत ११ सामने खेळले असून त्यात ४ विजय आणि ७ पराभवांचा समावेश आहे. चेन्नई सुपर किंग्जने उर्वरित तीनही सामने जिंकले तर ते प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या शर्यतीत असतील. मात्र, त्यानंतर त्याला नेट रन रेट आणि इतर संघांवर अवलंबून राहावे लागेल.

- Advertisement -

हेही वाचा – दुखापतीमुळे भारतीय संघाचा ‘हा’ खेळाडू दक्षिण आफ्रिका दौऱ्याला मुकण्याची शक्यता

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -