घरअर्थजगतLIC चे गुंतवणूकदार पहिल्याच दिवशी तोट्यात, 8.62% च्या घसरणीसह शेअर्सची लिस्टिंग

LIC चे गुंतवणूकदार पहिल्याच दिवशी तोट्यात, 8.62% च्या घसरणीसह शेअर्सची लिस्टिंग

Subscribe

सोमवारी सूचीबद्ध होण्याच्या एक दिवस आधी LIC IPO चे GMP उणे 25 रुपयांवर घसरले होते. आज त्यामध्ये थोडी सुधारणा झाली होती आणि लिस्ट होण्यापूर्वी तो 20 रुपयांच्या नकारात्मक ट्रेंडवर व्यवहार करीत आहे. एका वेळी तो ग्रे मार्केटमध्ये 92 रुपयांच्या प्रीमियमसह व्यवहार करीत होता.

नवी दिल्लीः BSE आणि NSE वर डिस्काऊंट लिस्ट केल्यानंतर LIC चे बाजारमूल्य (LIC MCap) 6 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज होता. परंतु प्री-ओपनमध्ये 12 टक्क्यांहून अधिक घसरल्यानंतर बाजारमूल्य केवळ 5 लाख कोटी रुपयांपेक्षा काहीसा अधिक राहू शकला आहे. अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आज सरकारी विमा कंपनी एलआयसीचे शेअर्स खुल्या बाजारात सूचिबद्ध झाले. मात्र, शेअर बाजारात एलआयसीची सुरुवात चांगली झाली नाही. LIC चा स्टॉक BSE वर 8.62 टक्क्यांच्या मोठ्या सूटवर सेटल झाला. LIC ची लिस्टिंग सवलतीत होणार आहे, असे आधीच वाटत होते, पण इतक्या मोठ्या घसरणीने सुरुवात होईल, अशी अपेक्षा कोणीही केली नव्हती.

प्री-ओपनमध्येच मोठी घसरण

LIC च्या समभागाने बीएसईवर आज पहिल्या दिवसाची चांगली सुरुवात केली नाही. यापूर्वी LIC च्या समभागाने BSE वर प्री-ओपन सत्रात 12 टक्क्यांहून अधिक घसरणीसह व्यवहार सुरू केला होता. प्री-ओपनमध्ये एलआयसीचा शेअर 12.60 टक्के म्हणजेच 119.60 रुपयांच्या तोट्यासह पहिल्या दिवशी 829 रुपयांपासून सुरू झाला. प्री-ओपनच्या एका टप्प्यात हा स्टॉक 13 टक्क्यांनी घसरला होता.

- Advertisement -

सर्वात मोठा IPO असल्याचे सिद्ध झाले

LIC चा हा पहिला इश्यू भारताच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO असल्याचे सिद्ध झाले आहे. या IPO साठी किंमत 902-949 रुपये निश्चित करण्यात आली होती. प्रथमच दोन्ही वीकेंडला आयपीओ खुला राहिला. विक्रमी 6 दिवस खुल्या असलेल्या LIC च्या IPO ला जवळपास प्रत्येक श्रेणीत चांगला प्रतिसाद मिळाला. ग्रे मार्केट (LIC IPO GMP) मध्ये LIC IPO चा प्रीमियम लिस्ट होण्यापूर्वी नकारात्मक होता, त्यामुळे पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे नुकसान झाले आहे.

ग्रे मार्केट प्रीमियम सध्या खूप नकारात्मक

सोमवारी सूचीबद्ध होण्याच्या एक दिवस आधी LIC IPO चे GMP उणे 25 रुपयांवर घसरले होते. आज त्यामध्ये थोडी सुधारणा झाली होती आणि लिस्ट होण्यापूर्वी तो 20 रुपयांच्या नकारात्मक ट्रेंडवर व्यवहार करीत आहे. एका वेळी तो ग्रे मार्केटमध्ये 92 रुपयांच्या प्रीमियमसह व्यवहार करीत होता. टॉप शेअर ब्रोकरच्या डेटानुसार, सध्या LIC IPO चा ग्रे मार्केट प्रीमियम उणे 20 रुपये आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना नुकसान सहन करावे लागू शकते, असे संकेत जीएमपीकडून मिळत होते. एलआयसीचे लिस्टिंग सवलतीने होणार आहे, असेही विश्लेषक गृहीत धरत होते.
शासकीय विमा कंपनीचा लिस्टिंग सोहळा सकाळी 08:45 वाजता सुरू झाला. बीएसईचे सीईओ आणि एमडी आशिष कुमार चौहान, डीआयपीएएमचे सचिव तुहिन कांत पांडे यांच्यासह एलआयसीचे सर्व अधिकारी लिस्टिंग समारंभात उपस्थित होते. देशातील सर्वात मोठ्या IPO मध्ये 16,20,78,067 शेअर्स ऑफर करण्यात आले होते आणि त्यांच्यासाठी 47,83,25,760 बोली प्राप्त झाल्या होत्या. पॉलिसीधारकांच्या श्रेणीमध्ये IPO 6.12 पट सबस्क्राइब झाला. तसेच एलआयसी कर्मचार्‍यांसाठी राखीव भाग 4.4 पट सबस्क्राइब झाला. किरकोळ गुंतवणूकदारांचा हिस्सा देखील 1.99 पट सबस्क्राइब झाला. या व्यतिरिक्त QIB साठी राखून ठेवलेला भाग 2.83 वेळा आणि NII भाग 2.91 वेळा सदस्य झाला. एकूणच LIC IPO ला 2.95 पट सबस्क्रिप्शन मिळाले.

- Advertisement -

हेही वाचाः जानेवारी 2021 ते मार्च 2022 पर्यंत 42 भारतीय विमानतळावरील 84 कर्मचारी आढळले मद्यधुंद- DGCA

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -