घरताज्या घडामोडीराज्यात सध्या १९५० कोरोना रुग्ण सक्रिय, आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणतात, चौथी लाट...

राज्यात सध्या १९५० कोरोना रुग्ण सक्रिय, आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणतात, चौथी लाट फार मोठा…

Subscribe

कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाला असून राज्यात आणि देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यात कोरोना प्रादुर्भावात घट झाल्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. परंतु मागील दोन दिवसांच्या तुलनेत रविवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असल्याचे आढळले आहे. चौथ्या लाटेबाबत परदेशात चर्चा सुरु आहे. यामध्ये देशात आणि राज्यात चौथी लाट येणार का? असा प्रश्न आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना करण्यात आला होता. यावर चौथी लाट फार मोठा विषय नसल्याचे राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला, यावेळी त्यांना चौथ्या लाटेविषयी प्रश्न करण्यात आला होता. प्रश्नाला उत्तर देताना आरोग्यमंत्री म्हणाले की, राज्यातील कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्क्यांवर आलं आहे. तसेच सध्या १९५० सक्रीय कोरोना रुग्ण आहेत. राज्यात कोरोनाच्या चौथ्या लाटेच्या चर्चेत तथ्य वाटत नाही. कोरोनाची चौथी लाट राज्यात येणार नाही. लसीकरणसुद्धा राज्यामध्ये चांगल्या प्रमाणात झालं आहे. त्यामुळे हा फार मोठा विषय नाही.

- Advertisement -

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लग्न सोहळे, राजकीय कार्यक्रम, मेळावे होत आहेत. नागरिकांची गर्दी होत आहे. असे असतानाही कोरोनाच्या संख्येत वाढ होताना दिसत नाही. त्यामुळे काळजी करण्याची गरज आहे. चौथी लाट येईल अशी शक्यता वाटत नाही असे राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

अँटिबॉडी टेस्ट करुन बूस्टर डोस घ्या

बूस्टर डोसबाबत केंद्राच्या सूचना आहेत. केंद्राच्या सूचनेनुसार राज्यात बूस्टर डोस देण्यात येत आहे. नागरिकांनी अँटिबॉडीची टेस्ट करुन बूस्टर डोस घेण्याचा निर्णय घ्यावा असे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितले आहे. आरोग्य विभागातील प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि इतर कार्यकर्त्यांशी संवाद साधत असल्याचे राजेश टोपे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : कोणीही असो शिवसेना अपक्षाला पाठिंबा देणार नाही, संभाजीराजेंच्या उमेदवारीवर राऊतांचे स्पष्ट वक्तव्य

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -