घरताज्या घडामोडीकोणालाही न घाबरता अन् जुमानता कट्टर शिवसैनिकाला जिंकवायचं, मुख्यमंत्र्यांचे सेना आमदारांना आदेश

कोणालाही न घाबरता अन् जुमानता कट्टर शिवसैनिकाला जिंकवायचं, मुख्यमंत्र्यांचे सेना आमदारांना आदेश

Subscribe

राज्यसभा निवडणुकीमध्ये आपल्याला जिंकायचे आहे तसेच कट्टर शिवसैनिकाला जिंकवायचे आहे असा आदेश मुख्यमंत्र्यांनी आमदारांना दिला आहे. राज्यसभा निवडणुकीमध्ये आपल्याला जिंकायचे आहे तसेच कट्टर शिवसैनिकाला जिंकवायचे आहे असा आदेश मुख्यमंत्र्यांनी आमदारांना दिला

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात वर्षावर सेना आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अपक्ष आमदारसुद्धा होते. कोणालाही न घाबरात आणि जुमानताल शिवसेनेच्या उमेदवाराला राज्यसभेवर पाठवायचंय असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांना दिला आहे. यानंतर दोन बसमधून आमदारांना हॉटेलमध्ये रवाना करण्यात आले आहे. तसेच मत फुटू नये यासाठी शिवसेनेकडून व्हिप जारी करण्यात आला आहे. शिवसेनेच्या दोन उमेदवारांना जिंकण्यासाठी रणनिती तयार करण्यात आली आहे. (cm uddhav thackeray appeal shivsena MLA)

शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये वर्षा निवासस्थानी आमदारांची बैठक घेण्यात आली. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली असून आमदारांना मुख्यमंत्र्यांनी संबोधित केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवसेनेकडून राज्यसभेसाठी २ उमेदवार देण्यात आले आहेत. या उमेदवारांना जिंकवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी रणनिती आखली आहे. शिवसेनेचे दोन्ही आमदार निवडून येतील असा विश्वास मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

बैठकीनंतर आमदारांनी पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचे सांगितले आहे. एकत्र राहण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. राज्यसभा निवडणुकीमध्ये आपल्याला जिंकायचे आहे तसेच कट्टर शिवसैनिकाला जिंकवायचे आहे असा आदेश मुख्यमंत्र्यांनी आमदारांना दिला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून दोन उमेदवार दिलेत यापैकी, शिवसेना खासदार संजय राऊत यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय पवार यांना संधी देण्यात आली आहे. संजय पवार यांच्या विजयासाठी शिवसेना मतांची जुळवाजुळव करत आहे.

आमदार हॉटेलमध्ये रवाना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीनंतर वर्षावरुन थेट आमदारांना हॉटेलमध्ये नेण्यात आले आहे. तसेच मते फुटू नये यासाठी व्हिप जारी करण्यात आला आहे. राज्यसभेची निवडणूक होईपर्यंत आमदार हॉटेलमध्ये राहणार आहेत. मुंबईतील रिट्रीट या हॉटेलमध्ये सेना आमदारांना ठेवण्यात येणार आहे. या आमदारांवर शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांचा पहारा असणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : जिथे आपल्यावर बंधने घातली जातात, तिथे थांबायचे नसते – संभाजीराजे छत्रपती

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -