घरमुंबईकाँग्रेसकडून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर, भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरेंना संधी

काँग्रेसकडून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर, भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरेंना संधी

Subscribe

राज्यात २० जूनला विधानपरिषदच्या १० जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणूकीसाठी काँग्रेसने आपल्या दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. मुंबई महापालिकेच्या पार्श्वभुमिवर काँग्रेसने भाई जगताप आणि चंद्रकांत हांडोरे यांना संधी दिली आहे. याबाबतचे अधिकृत पत्र काँग्रेसने काढले आहे.

- Advertisement -

 

२७ मतांची आवश्यकता –
विधानपरिषदच्या १० जागांसाठी सदस्य हे १० जागांसाठी मतदान करणार आहे. महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेचे ५६, राष्ट्र्वादी काँग्रेसचे ५४ आणि काँग्रेसचे ४४ आमदार आहेत, तर भाजपाचे १०५ असे प्रमुख राजकीय पक्षांचे बलाबल आहे. इतर पक्षांचे १६ आणि अपक्ष १३ आमदार आहेत. विधानसभेच्या एकुण आमदारांची संख्या आणि निवडणूकीच्या १० जागा लक्षात घेता विजय मिळवण्यासाठी २७ मतांची आवश्यकता आहे.

- Advertisement -

महाविकास आघाडीचे 6 उमेदवार –
महाविकास आघाडीचे संख्याबळ लक्षात घेतले तर पाच उमेदवारांचा विजय निश्चित आहे, पाच उमेदवार सहज निवडून येणार आहेत. यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन आणि काँग्रेसचे एक उमेदावार आहेत. काँग्रेसने दोन उमेदवार दिल्याने महाविकास आघाडी सहा उमेदवार देणार हे स्पष्ट झाले आहे. छोटे पक्ष आणि अपक्ष आमदार यांची जमवाजमव केल्यास, महाविकास आघाडी सहावा उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे.

भाजपकडून 5 नावं निश्चित –

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून 5 नावं निश्चित करण्यात आली आहेत. प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे यांना उमेदवारी देण्यात आली असून, भाजप नेत्या पंकजा मुंडेंना डावलण्यात आले आहेत. प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना भाजपने पुन्हा एकदा विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून त्यांना पुन्हा संधी देण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

 

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -