घरदेश-विदेशतीन लग्न, घटस्फोट ते रिल्स स्टार; पाकिस्तानी खासदार आमीर लियाकत यांचा संशयास्पद...

तीन लग्न, घटस्फोट ते रिल्स स्टार; पाकिस्तानी खासदार आमीर लियाकत यांचा संशयास्पद मृत्यू

Subscribe

पाकिस्तानी खासदार आणि टिव्ही होस्ट आमीर लियाकल यांचा कराचीमध्ये संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. ते 49 वर्षांचे होते. कराची स्थित घरात त्याचा मृतदेह आढळून आला आहे. कार्डियक अरेस्टमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. तीन लग्न आणि दुसऱ्या पत्नीसोबतच्या घटस्फोटामुळे आमीर लियाकल सर्वाधिक चर्चेत आले होते. दरम्यान भारतातही ते रिल्समुळे खूप लोकप्रिय झाले होते. त्यांच्या अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या, आमीर यांनी एक टिव्ही होस्ट म्हणून एक वेगळी छाप निर्माण केली. यानंतर जिओ टीव्हीवरील आलीम ऑनलाईन या धार्मिक कार्यक्रमांमुळे ते प्रसिद्धी झोतात आले. (Amir Liaqat Hussain Death)

टिव्ही होस्टशिवाय ते राजकारणातही सक्रिय होते. 2018 मार्चमध्ये ते इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षात सामील झाले. यानंतर निवडणुकीत ते कराचीमधून खासदार म्हणून निवडून आले. मात्र त्यांनी पक्षातून राजीनामा दिला. (Pakistani MP Amir Liaqua)

- Advertisement -

49 वर्षीय आमीर लियाकत यांचा जन्म 1972 रोजी कराचीत झाला होता. आमीर लियाकत यांनी तीन लग्न केली होती. मात्र दोन घटस्फोटानंतर तिसऱ्या पत्नीनेही घटस्फोटाची मागणी केल्याने खासदार आमीर तणावात होते असे म्हटले जाते.
आमीर यांनी 2018 मध्ये दुसरे लग्न केले, मात्र तिच्यासोबत त्यांनी घटस्फोट घेतला, यानंतर 2022 मध्ये घटस्फोट त्यांनी 31 वर्षांनी लहान तरुणी दानिया शाह हिच्यासोबत लग्न केले. मात्र या लग्नाच्या काही दिवसातचं दानियाने त्यांच्याकडे घटस्फोटाची मागणी केली.

यात बुधवारी रात्री त्यांची प्रकृती अचानक खालवली. त्यांनी रुग्णालयात जाण्यास नकार दिला, दरम्यान काही वेळाने त्यांचा वेदनेने ओरडतानाचा आवाज आल्याने घर काम करणाऱ्या तरुणाने त्याच्या खोलीजवळ धाव घेतली. यावेळी खासदार आमीर लियाकत खोलीत बेशुद्धावस्थेत पडलेले आढळले. मात्र रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले.


पंकजा मुंडेंना उमेदवारी न दिल्याने समर्थक आक्रमक; विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -