घरताज्या घडामोडीराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जींनी घेतली शरद पवारांची भेट, २२ पक्षांची बोलावली...

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जींनी घेतली शरद पवारांची भेट, २२ पक्षांची बोलावली दिल्लीत बैठक

Subscribe

राष्ट्रपतीच्या निवडणुकीसंदर्भात (Presidential election) भारतीय निवडणूक आयोगाने मोठी घोषणा केली आहे. येत्या १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या (Sharad Pawar) निवासस्थानी भेट घेतली आहे. मात्र, ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपती पदाचा उमेदवार निश्चित करण्यासाठी २२ पक्षांची बैठक उद्या दिल्लीत बोलवली आहे.

- Advertisement -

ममता बॅनर्जी यांनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. मात्र, शरद पवारांनी राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवावी, असं काँग्रेसच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे. परंतु ममता बॅनर्जींनी बैठकीपूर्वी पवारांच्या ६ जनपथ या निवासस्थानी भेट घेतल्यानंतर शरद पवारांनी ही निवडणूक लढवावी, अशी विनंती ममता बॅनर्जी त्यांना करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा : संसदेचे पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून, जीएसटी विधेयकासह महत्त्वाची विधेयके मंजूर होण्याची शक्यता

- Advertisement -

भाजपनेच शरद पवार यांना राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. देशात भाजपविरोधी आघाडीकडून शरद पवार यांना राष्ट्रपतिपदासाठीच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरु आहे. ही तयारी सुरु असतानाच संजय राऊतांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मात्र शरद पवार राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी उत्सुक नसल्याचं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ येत्या २४ जुलैला संपत आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून भारताच्या सर्वोच्च घटनात्मक पदासाठी म्हणजे राष्ट्रपतीपदासाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार असून २१ जुलै रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.


हेही वाचा : पंतप्रधान स्वत: सांगताहेत आम्ही 10 लाख नोकऱ्या देऊ, त्यावर त्यांनी कायम राहावे – संजय


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -