घरताज्या घडामोडीफडणवीस आमच्या संपर्कात आहे, ते आम्हालाच मतदान करतील; बच्चू कडूंची खोचक टीका

फडणवीस आमच्या संपर्कात आहे, ते आम्हालाच मतदान करतील; बच्चू कडूंची खोचक टीका

Subscribe

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. अपक्ष आमदारांची जुळवाजुळव करण्याचं काम महाविकास आघाडी आणि भाजपकडून केला जात आहे. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये देखील अशाच प्रकारचं चित्र आहे. आज मुंबई, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांच्या आपआपल्या गोटात बैठका सुरू पार पडत आहेत. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आमच्या संपर्कात आहेत, ते आम्हालाच मतदान करतील असा विश्वास आम्हाला आहे, अशी खोचक टीका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे.

आज मतदान कसे करावे याबाबत ट्रायल होती. एकदा चुकलो म्हणून परत चुकू नये यासाठी काळजी घेतोय. मुख्यमंत्री आमच्याशी हितगुज करणार आहेत, असं बच्चू कडू म्हणाले. भाजप नेते अपक्ष आपल्या संपर्कात असल्याचा दावा करत आहे असे पत्रकारांनी विचारल्यावर बच्चू कडू म्हणाले की, आम्ही पण संपर्कात आहोत की देवेंद्रजी, आम्हाला कसं मत देतील तसेच मला पूर्ण विश्वास आहे की देवेंद्रजी आम्हाला मत देतील.

- Advertisement -

दरम्यान, विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदारांची ताज हॉटेल बैठक सुरू आहे. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस त्यांना मार्गदर्शन करत आहेत. तसेच फोर सिझन हॉटेलमध्ये काँग्रेसची बैठक सुरू आहे.तर ट्रायडंट हॉटलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरू आहे. यंदाच्या निवडणुकीत सर्वच पक्षातून जोर लावला जात असून महाविकास आघाडी विरूद्ध भाजप असा सामना पहायला मिळणार आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीतील मतांचा कोटा जास्त ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं आहे. शिवसेनेचे उमेदवार अडचणीविणा निवडून येतील. पण आम्हाला मतांची गरज आहे, असंही अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : २६ चा आकडा गाठायला जे कमी पडतील त्यांची विकेट पडेल – अजित पवार


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -