घरमहाराष्ट्रअजूनही वेळ गेलेली नाही, आपण मार्ग काढू, उद्धव ठाकरेंचं बंडखोरांना आवाहन

अजूनही वेळ गेलेली नाही, आपण मार्ग काढू, उद्धव ठाकरेंचं बंडखोरांना आवाहन

Subscribe

शिवसेना पक्षप्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे . समोर येऊन बोला आपण मार्ग काढू, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलंय. त्यामुळे बंडखोरांचे शिवसेनेत परतण्याचे मार्ग मोकळे असल्याचंही बोललं जातंय.

मुंबईः आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनीदेखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत, आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो, कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही, माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे, असं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणालेत. उद्धव ठाकरेंनी प्रसिद्धीस पत्रक देऊन हे शिंदे गटातील बंडखोरांना आवाहन केलं आहे.

आपल्या बाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे , आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. आपण या माझ्या समोर बसा, शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा, यातून निश्चित मार्ग निघेल, आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू. कोणाच्याही कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका, शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही, समोर आलात बोललात तर मार्ग निघेल. शिवसेना पक्षप्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे . समोर येऊन बोला आपण मार्ग काढू, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलंय. त्यामुळे बंडखोरांचे शिवसेनेत परतण्याचे मार्ग मोकळे असल्याचंही बोललं जातंय.

- Advertisement -


शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांनी शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत हे वादग्रस्त आणि आक्षेपार्ह विधान करून आमची मनं दुखवत असल्याचं माध्यमांच्या प्रतिनिधींकडे सांगितलं होतं. त्यानंतर आता उद्धव ठाकरेंनीच थेट शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांना पुन्हा शिवसेनेत परतण्याची आर्त हाक दिल्यानं राजकीय वर्तुळात हा विषय चर्चिला जात आहे.

एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या बंडाच्या आक्रमक पवित्र्याला आता आठवडाही उलटला असून, शिंदे गटाच्या बंडखोरांसोबत शिवसेनेकडून सकारात्मक अद्यापही झालेली नाही. त्यातच महाविकास आघाडी सरकारकडून शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांचे परतीचे मार्ग बंद करण्यास सुरुवात झालीय. ठाकरे सरकारकडून नऊ मंत्र्यांकडील खाती काढून घेऊन दुसऱ्या मंत्र्यांकडे सोपवण्यात आली आहेत. तर संजय राऊत आणि आदित्य ठाकरेसुद्धा बंडखोरांबद्दल टोकाची विधानं करताना पाहायला मिळत आहेत.

- Advertisement -

हेही वाचाः त्यांनी संपर्कात असलेल्या आमदारांची नावे जाहीर, एकनाथ शिंदेंचं शिवसेनेला आव्हान

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -